निवडणूक आयोगाने घातली एक्झिट पोलवर बंदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 विशेष प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने मंगळवारी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. २१ ऑक्टोबर रोजी, महाराष्ट्र व हरियाणा या दोन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसह १७ राज्यांमधील ५१ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांसाठी तसेच, महाराष्ट्रातील सातारा व बिहारमधील समस्तीपुर येथील लोकसभेच्या जागेसाठी देखील मतदान होणार आहे. या दिवशी आयोगाकडून मतदानोत्तर कल दाखवणाऱ्या एक्झिट पोलवर बंदी घालण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्या शेफाली शरण यांनी यांसदर्भात ट्विट केले आहे. २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता, त्या दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत एक्झिट पोल दाखवले जाऊ शकणार नाहीत. असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

महाराष्ट्र व हरियाणा येथील विधानसभा निवडणुकीसह १७ राज्यांधील ५२ विधानसभा मतदारसंघात व महाराष्ट्रातील सातारा आणि बिहारमधील समस्तीपुर लोकसभा मतदार संघात पोटनिवडणुक होणार आहेत. तर, २४ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या दिवशी मतदानाचा कल (ओपिनियन पोल), अन्य कल तसेच सर्वे दाखवण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे.

 

Leave a Comment