निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर

State Election Commission
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यामध्ये सातारा जिल्ह्यातील 5 नगरपालिकाचा समावेश आहे. राज्यातील नगरपरिषदाचा निवडणुकीचा बिगूल वाजला असून 18 ऑगस्ट रोजी मतदान तर 19 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे.

सातारा जिल्ह्यातील कराड, फलटण म्हसवड, रहिमतपूर, वाई या 5 नगरपालिकाचा समावेश आहे. तसेच राज्यातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगावस अहमदनगर, औरंगाबाद, जालना बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यातील 92 नगरपरिषदाचा समावेश आहे. तर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा, पुणे जिल्ह्यातील मंचर (नवनिर्मित), माळेगाव (बुद्रुक) आणि सोलापूर जिल्हयातील अनगर या नगरपंचायतीचा समावेश आहे.

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे – निवडणूक कार्यक्रम 20 जुलै रोजी जारी करण्यात येईल. अर्ज वेबसाईटवर भरण्याचा कालावधी दि. 22 जुलै ते 28 जुलै पर्यंत दुपारी 2 वाजेपर्यंत असेल. अर्ज छाननी 29 जुलै रोजी असेल. अर्ज माघारीचा कालावधी 4 ऑगस्ट पर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. अर्जबाबत अपील असल्यास 8 ऑगस्ट पर्यंत निर्णय दिला जाईल. निवडणूक चिन्ह देण्याचा तसेच निवडणूक लढविणार्‍या उमेदवाराची यादी 8 ऑगस्टनंतर प्रसिध्द होईल. तसेच मतदान 18 ऑगस्ट रोजी होणार असून दुसर्‍या दिवशी 19 ऑगस्टला निकाल जाहीर करण्यात येईल.