हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या वर्षभरापासून मार्केटमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांची पसंती इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. ही वाढती मागणी पाहता गेल्या वर्षभरापासून अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर गुजरात येथील स्टार्टअप कंपनी मॅटरने सुसज्ज वैशिष्ट्यांसह आपली Aera नावाची इलेकट्रीक बाईक लाँच केली आहे. ही इलेक्ट्रिक बाईक एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर 125 किलोमीटरपर्यंत रेंज देत असून बाजारात या गाडीचा सामना रिव्हॉल्ट RV400, टॉर्क क्रॅटोस आणि ओबेरॉन रोअर सारख्या बाईकशी होईल.
डिझाईन –
Matter कंपनीची ही इलेक्ट्रिक बाईक Aera 5000 आणि Aeroa 5000+ या २ व्हेरिएन्ट मध्ये लाँच करण्यात आली आहे. भारतीय बाजारपेठेत गियर असलेली ही पहिली इलेक्ट्रिक बाईक आहे हे विशेष… ही बाईक पूर्णपणे इलेक्ट्रिक असली तरी तिचा लुक हा पारंपारिक स्ट्रीट-फोकस बाइकसारखाच आहे. गाडीची डिझाईन अतिशय स्पोर्टी आहे.
125 किलोमीटरपर्यंत रेंज-
मॅटर एरा इलेक्ट्रिक बाइक 5kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. तसेच यामध्ये 10.5kW लिक्विड-कूल्ड इलेक्ट्रिक मोटर बसवण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक बाईकला फुल्ल चार्ज करण्यासाठी 5 तासांचा वेळ लागतो. मात्र एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर ही बाईक 125 किलोमीटरपर्यंत रेंज देते. या इलेक्ट्रिक बाईकच्या फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर, यात 7-इंचाचा टच डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, पार्क असिस्ट, कीलेस एंट्री, ऑटो कॉल रिप्लाय आणि ड्युअल चॅनल एबीएस, एक्सिडेंट डिटेक्शन यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
किंमत किती –
गाडीच्या किंमतीबद्दल सांगायचं झाल्यास, Mater aera 5000 या व्हेरिएन्टची किंमत 1.44 लाख रुपये आहे तर Mater aera 5000+ ची किंमत 1.54 लाख रुपये ठेवली आहे. या एक्स-शोरूम किमती आहेत. कंपनीकडून या गाडीचा बॅटरी पॅक आणि बाइक या दोन्हींवर ३ वर्षांची मानक वॉरंटी मिळेल.