Electric Bike : 135 किमी रेंज असलेली दमदार इलेक्ट्रिक बाइक लॉन्च; किंमत किती?

0
443
Electric Bike eco dryft
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल डिझेलच्या (Electric Bike) वाढत्या किमतीमुळे अलीकडच्या काळात अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता गेल्या वर्षभरात अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर हैदराबादस्थित दुचाकी उत्पादक कंपनी Pure EV (PURE EV) ने भारतात इलेक्ट्रिक बाइक लॉन्च केली आहे. एकदा फुल्ल चार्ज केल्यांनतर ही इलेक्ट्रिक बाईक तब्बल 135 किलोमीटरची रेंज देईल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. चला आज आपण जाणून घेऊया या गाडीची खास वैष्टिष्ट्ये आणि तिच्या किमतीबाबत…..

135 किलोमीटर रेंज –

नवीन Pure EV इलेक्ट्रिक बाइकमध्ये (Electric Bike) 30 kWh चा AIS 156 प्रमाणित बॅटरी पॅक देण्यात आला आहे. बॅटरी चार्ज करण्यासाठी 60 व्होल्टचा चार्जर देण्यात आला आहे. बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी एकूण 6 तास लागतात. गाडीचे टॉप स्पीड 75 किलोमीटर / प्रतितास असून एकदा फुल्ल चार्ज केल्यांनतर ही इलेक्ट्रिक बाईक 85 ते 135 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देण्यास सक्षम आहे. ड्रायव्हिंग रेंज राइडिंग आणि रस्त्याच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.

डिझाईन आणि फीचर्स – (Electric Bike)

गाडीच्या डिझाईनबद्दल सांगायचं झाल्यास, इकोड्रायफ्ट ही एक बेसिक कम्युटर मोटरसायकल आहे ज्याला अँगुलर हेडलॅम्प, 5-स्पोक अलॉय व्हील आणि सिंगल-पीस सीट मिळते. या बाईकचे एकूण वजन 101 किलो आहे. या इलेक्ट्रिक (Electric Bike) बाइकमध्ये डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ओडोमीटर, सेंट्रल लॉकिंग, पॅसेंजर फूटरेस्ट, एलईडी हेडलाइट आणि टेललाइट यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

किंमत किती –

गाडीच्या (Electric Bike) किमतीबाबत सांगायचं झाल्यास कंपनीने EcoDryft ची सुरुवातीची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत 99,999 रुपये ठेवली आहे. विविध राज्यानुसार या गाडीची किंमत वेगवेगळी असू शकते. तुम्ही ही दमदार इलेक्ट्रिक बाईक ब्लॅक, ग्रे, ब्लू आणि रेड या चार कलर ऑप्शन मध्ये खरेदी करू शकता.