हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवी मुंबईकरांना (Navi Mumbai) नवीन वर्षाचं गिफ्ट मिळणार आहे. मागच्या काही दिवसांपासून नवी मुंबईत इलेक्ट्रिक डबल डेकर बस येणार अशी चर्चा होती. आता या चर्चेला पूर्णविराम लागणार आहे. कारण येत्या नवीन वर्षात या इलेक्ट्रिक बस मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल होणार आहेत. नवी मुंबईतील प्रवाशांची गैरसोय रोखण्यासाठी तसेच नागरिकांचा आरामदायी आणि सुखकर करण्यासाठी नवीन वर्षात कूण 10 डबल डेकर इलेक्ट्रिक बस लोकांच्या सेवेसाठी येणार आहेत . नवी मुंबईतील पर्यटनाच्या दृष्टीने या गाड्यांची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ही नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. यामुळे प्रवासाचा वेळही वाचेल आणि आरामदायी प्रवास मिळेल.
अर्थसंकल्पात करण्यात आली याची तरतूद
NMMT च्या वतीने अनेक नवीन उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यातील एक उपक्रम म्हणजेच इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस. उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबवण्यात आला आहे. आधुनिक शहराला शोभेल असं उपक्रम हाती घेऊन शहर उत्तम बनवण्यासाठी हें प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी एकूण दहा गाड्यांची तरतूद ही अर्थसंकल्पातही मांडण्यात आली आहे.
काय विशेषता आहे या बसची?
या डबल डेकरच्या इलेक्ट्रिक एसी बसमुळे मुंबईकरांना मुंबईचे संपूर्ण दर्शन करायला मिळणार आहे. त्यामुळे अनेकांचे स्वप्न असलेल्या जीवाची मुंबई करण्याची संधी याद्वारे मिळणार आहे. एवढेच नव्हे तर यामुळे नवी मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी ही बस सुरू करण्याचे परिवहनचे प्रयोजन आहे. त्यामुळे खिशाला परवडेल अश्या दरात ही सुविधा देण्यात येणार आहे.
किती आहे गाडीची किंमत?
या डबल डेकर बस इतक्या सारख्या सुविधा देत असेल तर या गाडीची किंमत किती आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर या एका बसची किंमत ही तब्बल 1 कोटी 90 लाख रुपये एवढी आहे. नवी मुंबईकरांना नवीन वर्षात मिळणाऱ्या गिफ्टमुळे सरासरी 60 ते 65 रुपयाचे उत्पन्न मिळणार आहे. सध्या इलेक्ट्रिक बसमधून प्रति किलोमीटर 40 रुपये उत्पन्न NMMT ला मिळत आहे. या नव्या येणाऱ्या इलेक्ट्रिक बसमुळे उत्पन्न वाढणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास हा सोयीचा होणार आहे.