Electric Luna : Electric अवतारात आली Luna; 500 रुपयांत करा बुकिंग

Electric Luna Booking
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Electric Luna : बाजारात सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच चलती आहे. पेट्रोलचा खर्च वाचवण्यासाठी अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याला आपलं प्राधान्य देत आहेत. त्यामुळे वाढती मागणी पाहता अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हेरिएन्ट मध्ये लाँच करत आहेत. याच पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनी कायनेटिक ग्रीन पुढील महिन्यात आपली इलेक्ट्रिक लुना भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. उद्यापासून तुम्ही या लुनाचे बुकिंग अवघ्या ५०० रुपयांत करू शकता.

कसा असेल लूक –

या नव्या इलेक्ट्रिक लुनाच्या (Electric Luna) लूक बाबत सांगायचं झाल्यास, ती जुन्या मॉडेलप्रमाणेच असेल, यामध्ये बल्ब इंडिकेटरसह चौकोनी आकारात LCD हेडलाइट, स्टोरेज स्पेससह स्प्लिट सीट, फ्रंट क्रॅश गार्ड आणि मागील ग्रॅब रेल मिळतंय. तुम्हाला या इलेक्ट्रिक लुनामध्ये सस्पेंशनसाठी टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्ससह ड्युअल रीअर शॉक ऍबसॉर्बर आणि ब्रेकिंगसाठी दोन्ही बाजूना ड्रम ब्रेक्स असतील.

किती रेंज देईल – Electric Luna

Kinetic ची इलेक्ट्रिक Luna किती किलोमीटर पर्यंत रेंज देईल याबाबत कंपनीने अद्याप खुलासा केलेला नाही. मात्र ही इलेक्ट्रिक लुना 2kWh बॅटरी पॅकसह बाजारात येणार असल्याची शक्यता आहे. तसेच एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ती 80 किलोमीटर पर्यंत अंतर आरामात पार करेल असं म्हंटल जात आहे. यावेळी तिचे टॉप स्पीड ७० किलोमीटर प्रतितास इतकं राहील.

किंमत किती असेल-

Electric Luna ची किंमत अंदाजे ७० हजारांच्या आसपास असू शकते. उद्यापासून या लुनाचे बुकिंग सुरु असून अवघ्या ५०० रुपयांत तुम्ही बुकिंग करू शकता. कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्युशन्‍सचे उत्पादन केंद्र अहमदनगर येथे असून याठिकाणी उत्पादन केलं जात आहे. कंपनीने सांगितले की, या प्लांटमध्ये दर महिन्याला 5,000 इलेक्ट्रिक लुना तयार करण्याची क्षमता आहे.