Electric Scooter : फक्त 2 रुपयांत 10 किमी प्रवास; सर्वात परवडणारी Electric Scooter लाँच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या (Electric Scooter) किमतीच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. इलेक्ट्रिक गाड्यांची वाढती मागणी पाहता अनेक कंपन्या सुद्धा वेगवेगळी इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दिल्ली येथील इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्टार्ट-अप हॉप इलेक्ट्रिकने लिओ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवे हाय-स्पीड व्हेरिएन्ट लॉन्च केले आहे. ही इलेक्ट्रिक स्कुटर अतिशय परवडणारी असून अवघ्या 2 रुपयांच्या खर्चात तुम्ही या स्कुटरवरून 10 किलोमीटर प्रवास करू शकता. चला जाणून घेऊया या इलेक्ट्रिक गाडीची काही अन्य फीचर्स आणि तिच्या किमतीबद्दल…

Electric Scooter

120 किलोमीटर रेंज –

या इलेक्ट्रिक (Electric Scooter) स्कूटरमध्ये 2.2 kW BLDC हब इलेक्ट्रिक मोटर आहे, जी 90 Nm चे पीक टॉर्क आउटपुट देते. यामध्ये 2.1 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. कंपनीचा दावा आहे कि, 850-वॅटचा स्मार्ट चार्जर वापरून, 2.5 तासांत बॅटरी 0-80 टक्के चार्ज होऊ शकते. एकदा फुल्ल चार्ज केल्यांनतर ही इलेक्ट्रिक स्कुटर तब्बल 120 किलोमीटर पर्यंत रेंज देते. Hop Leo ला इको, पॉवर, स्पोर्ट आणि रिव्हर्स असे चार राइडिंग मोड मिळतात. गाडीचे टॉप स्पीड 53 किमी प्रतितास आहे.

Electric Scooter HOP Leo

सस्पेन्शन आणि लोड क्षमता –

सस्पेन्शनबद्दल बोलायचे (Electric Scooter) झाले तर, गाडीच्या पुढच्या बाजूला अपराइट टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागच्या बाजूला हायड्रॉलिक स्प्रिंग-लोडेड शॉक ऑब्जर्वर सस्पेंशन मिळते. Hop Leo 160 किलोग्रॅम लोड सहन करू शकते. या इलेक्ट्रिक स्कुटरला 160 मिमी ग्राउंड क्लीयरन्स मिळतो. त्यामुळे खडबडीत रस्त्यावर सुद्धा ही स्कुटर अगदी सहज धावू शकते.

Electric Scooter HOP Leo

किती आहे किंमत – (Electric Scooter)

या इलेक्ट्रिक स्कुटरच्या किमतीबद्दल सांगायच झाल्यास, नवीन Hop Leo ची एक्स-शोरूम किंमत 97,000 रुपये आहे. ही स्कुटर कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि एक्सपीरएंस सेंटरच्या माध्यमातून बुक केली जाऊ शकते. लिओ हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर स्कूटर ब्लॅक, व्हाईट, ग्रे, ब्लू आणि रेड या पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.