Electric Tiffin Box | आता कधीही घ्या गरमागरम जेवणाचा आस्वाद; बाजारात आलाय इलेक्ट्रिक टिफिन बॉक्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Electric Tiffin Box | आजकाल मानवाची जीवनशैली बदललेली आहे. त्यामुळे प्रत्येकजण करियरच्या आणि नोकरीच्या मागे धावत असतो. आणि या सगळ्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असतो. कारण लोक वेळेवर जेवण करत नाही. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त ते बाहेरचे जेवण खातात. धावपळीच्या जीवनात दुपारी लोकांना घरी बनवलेलं ताज आणि गरम अन्न खाणं शक्य होत नाही. परंतु अशावेळी आता तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आला आहे. ते म्हणजे बाजारात आता इलेक्ट्रिक टिफिन बॉक्स उपलब्ध झाला आहे. या टिफिन बॉक्समध्ये तुमचं जेवण अगदी ताजे आणि गरम राहते. त्यामुळे तुम्ही सकाळी डब्यात भरलेले जेवण दुपारपर्यंत अगदी गरम राहते. आणि तुम्हाला एकदम गरमागरम जेवणाचा आस्वाद घेता येतो.

इलेक्ट्रिक टिफिन बॉक्स नक्की काय आहे | Electric Tiffin Box

हा नवीन इलेक्ट्रिक टिफिन बॉक्स नॉर्मल टिफिन बॉक्सप्रमाणे दिसतात. परंतु त्यात एक इलेक्ट्रिक फिटिंग घटकाचा समावेश असतो. जेवण गरम करण्यासाठी आणि ताजे ठेवण्यासाठी असतात. यामध्ये विजेचा वापर केला जातो. या टिफिन बॉक्समध्ये टेंपरेचर नियंत्रित करण्याचा आणि टाइमरचाही समावेश असतो. त्यामुळे तुम्ही तुम्हाला पाहिजे तेवढे अन्न गरम करू शकता.

इलेक्ट्रिक टिफिन बॉक्सचे फायदे | Electric Tiffin Box

गरम आणि ताजे जेवण

तुम्ही आता केलेले जेवण दुपारी किंवा संध्याकाळी जरी खायचे म्हटले तरी ते अगदी ताजे आणि गरम राहते. त्यामुळे तुम्हाला चांगल्या जेवनाचा आस्वाद घेता येतो.

वापरण्यास सोयीस्कर

हा इलेक्ट्रिक टिफिन बॉक्स वापरण्याला अगदी सोपा आहे. यासाठी तुम्ही तुमचं जेवण टिफिन बॉक्समध्ये ठेवायचा आणि लॉग इन करायचं. त्यानंतर तुमचे जेवण गरम होते.

वेळेची बचत

तुम्हाला दुपारी देखील गरमागरम जेवण मिळते. यासाठी तुम्हाला दुसरीकडे कुठेही जाण्याची गरज नाही. त्यामुळे तुमचा वेळ देखील वापरतो.

पर्यावरण पूरक

या इलेक्ट्रिक टिफिन बॉक्समुळे प्लॅस्टिकच्या टिफिन बॉक्सचा वापर कमी होतो. आणि पिशव्यांचा वापर कमी होतो. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास देखील कमी होतो.

टिफिन बॉक्स घेताना या गोष्टी लक्षात | Electric Tiffin Box

  • तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य आकाराचा टिफीन बॉक्स निवडू शकता. तुम्हाला किती जेवण गरम करायचा आहे. यावर ते अवलंबून असते.
  • शक्तिशाली हीटिंग घटक असलेला टिफिन बॉक्स निवडा.
  • टायमर असलेल्या टिफिन बॉक्स विकत घ्या जेणेकरून तुमचे जेवण किती वेळात गरम करायचे. हे तुम्हाला निश्चित करता येईल.
  • बाजारामध्ये वेगवेगळ्या किमतीचे टिफिन बॉक्स उपलब्ध आहे. तुमच्या बजेटनुसार तुम्ही हा टिफीन बॉक्स विकत घ्या.