Electricity Bill : वीज ग्राहकांना मोठा झटका; दर कमी होणार नाहीतच

Electricity Bill
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (MSEB) लिमिटेडच्या विनंतीनुसार महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MERC) 28 मार्च 2025 रोजी जाहीर केलेल्या वीज दर आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. हा आदेश 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार होता, परंतु त्यामध्ये काही स्पष्ट चुका असल्याचे महावितरणने निदर्शनास आणले आहे. त्यामुळे जोपर्यंत याचिका निकाली निघणार नाही जुनेच दर लागू होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा झटका बसला आहे.

महावितरणच्या वकिलांनी सांगितले की, या वीज दर (Electricity Bill) आदेशातील चुका आणि विसंगती या वर्ष 2025-26 ते 2029-30 या पाच वर्षांच्या नियामक कालावधीतील वीज दराच्या मूळ स्वरूपावर परिणाम करत आहेत. तसेच, हा दर लागू केल्यास विविध प्रकारच्या ग्राहकांना आणि वीज वितरण क्षेत्रातील इतर संबंधित घटकांना मोठे आणि अपरिवर्तनीय नुकसान होऊ शकते. त्यामुळे या आदेशावर तातडीने स्थगिती द्यावी अशी मागणी महावितरणने केली आहे. म्हणजे 850 रुपये होणारे वीजबिल 1000 रुपयेच राहणार आहे. त्यामुळे सध्या तरी वीज ग्राहकांना कोणताही दिलासा मिळणार नसल्याचं दिसतंय.

महावितरणच्या वकिलांनी यासंदर्भात सविस्तर पुनरावलोकन याचिका एप्रिल 2025 च्या अखेरीस सादर केली जाईल, असे सांगितले. या पार्श्वभूमीवर आयोगाने 28 मार्च 2025 रोजी जाहीर केलेल्या नवीन वीज दर आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. .एप्रिल महिन्याच्या शेवटाला पुनरावलोकन याचिका महावितरण दाखल करणार आहे. नियामक आयोगानं नफा दाखवत महावितरणच्या सर्वच गटातील ग्राहकांना दिलासा दिला होता. मात्र, महावितरणकडून तोटा होत असल्याचं सांगण्यात येत आहे