हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Elephanta Caves) मुंबईजवळ असणाऱ्या घारापुरी लेणी म्हणजेच एलिफंटा केव्ह्स या पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण आहे. त्यामुळे बरेच पर्यटक इथे कायम येताना दिसतात. खास करून उन्हाळी सुट्ट्यांमध्ये इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. घारापुरी बेटावरील डोंगरात एकूण ५ लेण्या खोदलेल्या आहेत. ज्या अतिशय सुंदर, आकर्षक आणि कोरीव असल्याने लक्षवेधी ठरतात. इथे जाण्यासाठी बोटीतून प्रवास करावा लागतो. तुम्हीही या ठिकाणी जायचा प्लॅन करत असाल तर थांबा.. आता ४ महिने तुम्हाला वाट बघावी लागणार आहे. त्याशिवाय तुम्ही कितीही ठरवला तरीही एलिफंटाला जाऊ शकणार नाहीये. याविषयी चला सविस्तर माहिती घेऊया.
४ महिने थांबावं लागणार
मुंबईतील घारापुरी म्हणजेच एलिफंटा लेणी येथे पोहोचण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथून बोटीने प्रवास करावा लागतो. हा प्रवास साधारण १ तासाचा आहे. तुम्ही जर येत्या काही दिवसात एलिफंटाला जायचा विचार करत असाल तर आता तुमचा प्लॅन यशस्वी होऊ शकणार नाही. कारण, पावसाळ्याच्या ४ महिन्यांसाठी इथे जलवाहतूक बंद ठेवण्यात येते. (Elephanta Caves) त्यानुसार, येत्या १ जून २०२४ पासून पुढचे ४ महिने गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा ही बोट सेवा बंद राहणार आहे. एकतर एलिफंटाला जाण्यासाठी बोटीशिवाय पर्याय नाही. त्यात बोट सेवा बंद झाल्यानंतर इथे जाणं अशक्यच. त्यामुळे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे ४ महिने तुम्हाला एलिफंटाला जाण्याचा प्लॅन करता येणार नाहीये.
एलिफंटा गुंफा (Elephanta Caves)
एखाद्या गड किल्ल्याप्रमाणे घारापुरीच्या या प्राचीन लेण्याचे देखील जातं करण्यात आले आहे. या लेण्या महाराष्ट्राच्या वैभशाली इतिहासाच्या साक्षीदार आहेत. या लेणी समुद्राच्या मध्यभागी एका लहानशा बेटावरील डोंगरात कोरण्यात आल्या असून अत्यंत प्राचीन आहेत. एलिफंटा लेण्यांमधील प्राचीन गुंफा या इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण मानले जाते. या लेण्या म्हणजे मध्ययुगीन रॉक- कट कला आणि उत्कृष्ट वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहेत.
UNESCO ने दिला जागतिक वारसा स्थानाचा दर्जा
मुंबईपासून सुमारे ६ ते ७ मैल अंतरावर समुद्रातील घारापुरी या लहान बेटावरील एका डोंगरात एलिफंटा लेणी कोरण्यात आल्या आहेत. ज्या चारही बाजुंनी समुद्राने वेढलेल्या आहेत. या ठिकाणी एकूण ७ गुंफा आहेत. (Elephanta Caves) माहितीनुसार, ९ व्या ते १३ व्या शतकात एलिफंटा लेणीची निर्मिती झाली आहे. या लेण्यांना १९९७ साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला आहे. इथे बौद्धकालीन दगडी कोरीव शिल्पे पहायला मिळतात. शिवाय या लेण्यांमध्ये प्राचीन शिवमंदिर देखील आहे.