अकरावी सीईटीची प्रवेश परीक्षा वेबसाईट तूर्तास बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : दहावीचा निकाल जाहीर झाला असून इयत्ता अकरावी सीईटीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, तांत्रिक बाबींच्या कारणास्तव सीईटीची वेबसाईट तूर्तास बंद ठेवण्यात आली आहे.

प्रवेशप्रक्रिया पूर्ववत सुरू झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांना सूचित करण्यात येणार आहे. तसेच सीईटी परीक्षेची नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधी देण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.

अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेचे आयोजन २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत करण्यात आले आहे. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या वेबसाईटवरून अर्ज करण्याची सुविधा २६ जुलै अखेरीस उपलब्ध करुन देण्यात आली होती.

Leave a Comment