Elphinstone Bridge: मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रिज आजपासून दोन वर्षांसाठी बंद ! मुंबईकरांसाठी काय आहे पर्यायी मार्ग ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Elphinstone Bridge: मुंबईतील शतकानुशत जुना आणि महत्त्वाचा एल्फिन्सटन रोड ओव्हरब्रिज (ROB) गुरुवारपासून दोन वर्षांसाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. या पुलाचा पुनर्बांधणीचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ने घेतला असून तो ‘सेवरी-वर्ली उड्डाणपूल प्रकल्पा’अंतर्गत नव्याने उभारला जाणार आहे.

एल्फिन्सटन ब्रिज मध्य मुंबईतील परळ आणि प्रभादेवी या महत्त्वाच्या भागांना (Elphinstone Bridge) जोडणारा पूल असून, तो पूर्व आणि पश्चिम मुंबईला जोडणाऱ्या मुख्य संपर्कांपैकी एक आहे. पुलावरील वाहतूक पूर्णतः थांबवल्याने त्याचे ध्वस्तीकरण अधिक सुलभ होणार आहे.

एप्रिलपर्यंत अंतिम मुदत

मुंबई ट्राफिक पोलिसांनी या कामासाठी नोटिफिकेशन जारी केले असून नागरिकांकडून वाहतूक व्यवस्थेबाबत हरकती मागवण्यात आल्या आहेत. या हरकती 13 एप्रिलपर्यंत स्वीकारल्या जाणार असून, त्यानंतर 15 एप्रिलपासून पुलाचे (Elphinstone Bridge) पाडकाम सुरू होण्याची शक्यता आहे.

पर्यायी मार्ग

  1. मडके बुवा चौक (परळ टीटी) – उजवीकडे वळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर प्रवेश.
  2. खोदादाद सर्कल (दादर टीटी) – डावीकडे वळून तिलक ब्रिजमार्गे पुढे प्रवास.
  3. परळ वर्कशॉप – सुपारीबाग – भारतमाता जंक्शन मार्गे महादेव पलव रोडवर उजवीकडे वळून लोअर परळ ब्रिजकडे.
  4. संत रोहिदास चौक (एल्फिन्सटन जंक्शन) – सरळ जाऊन वडाचा नाका जंक्शनहून डावीकडे वळून लोअर परळ ब्रिजमार्गे पुढे.
  5. महादेव पलव रोड (करी रोड रेल्वे ब्रिज) – एकमार्गी वाहतूक:
  • सकाळी ७ ते दुपारी ३: भारत माता जंक्शन → शिंगटे मास्टर चौक
  • दुपारी ३ ते रात्री ८: शिंगटे मास्टर चौक → भारत माता जंक्शन
  • रात्री १० ते सकाळी ७: दोन्ही बाजूने वाहतूक खुली वाहतुकीवर संभाव्य परिणाम (Elphinstone Bridge)

या पुलाच्या बंदमुळे दादर, लोअर परळ, करी रोड आणि भारतमाता परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन ट्राफिक पोलिसांकडून करण्यात आले आहे.