Viral Video : गुडघ्यावर बसला अन..!! कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी हत्तीचा हृदयस्पर्शी संघर्ष; व्हिडीओ पाहून येईल डोळ्यात पाणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आईसारखंच बापाचं काळीज सुद्धा आपल्या मुलांसाठी तुटत असतं. बापाला कणखर राहून ऊन, पाऊस, वारा झेलून आपलं कुटुंब सुरक्षित ठेवायचा असतं. कदाचित म्हणूनच बाप कठोर वाटतो. पण त्याच्या कठोर असण्यात दडलेलं प्रेम कुणालाच दिसत नाही.परिस्थिती कोणतीही बाप आपल्या मुलांसाठी ढालीसारखा उभा राहतो हेच सत्य आहे. सध्या सोशल मीडियावर अशाच एका बापाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी अक्षरशा झुकला, गुडघ्यावर बसला पण त्याने आपल्या मुलांचं रक्षण केलं.

हा व्हायरल होणारा व्हिडीओ एका हत्तीचा आहे. सर्वात बुद्धीमान आणि बलशाली प्राणी म्हणून हत्तीला ओळखले जाते. सोशल मीडियावर हत्तींचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही क्युट तर काही आश्चर्यकारक. पण हा व्हिडीओ मात्र डोळ्यात पाणी आणणारा आहे. एक हत्ती आपल्या कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी माणसांकडे मदत मागतो आहे. अक्षरशः गुढघ्यावर बसून या हत्तीने माणसाला आपल्या पिल्लांचा जीव वाचवण्यासाठी मदत करावी अशी विनंती केल्याचा हा व्हिडीओ आहे. अत्यंत हृदयस्पर्शी असा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, हत्तीची पिल्लं आणि हत्तीण एका खड्ड्यात पडले आहेत. पावसामुळे सर्वत्र चिखल झाला आहे आणि यावेळी हत्तीचं कुटुंब एका कुटुंबात पडलं आहे. त्यांना या खड्ड्यातून बाहेर पडता येत नाहीये आणि म्हणून या हत्तीने रस्त्यावर जाऊन मदत मागितली आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एक जीप जंगलातून जात आहे. अशातच एक हत्ती जीपसमोर येतो आणि अक्षरश: गुडघ्यांवर बसून आपल्या कुटुंबीयांसाठी मदत मागतो. इतक्या बलाढ्य प्राण्याला असा हतबल झालेला पाहून जीपमधील माणसं ही पशुवैद्य अधिकारी होती.

(Viral Video)त्यामुळे या हत्तीच्या कुटुंबाची मदत करण्यासाठी हे पशुवैद्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य सुरु केले. मुसळधार पावसामुळे त्यांना बचावकार्यात अडथळा येत होता. म्हणून त्यानी जेसीबीच्या मदतीने चिखल खोदून हत्तीण आणि पिल्लाला खड्ड्यातून बाहेर काढले. सोशल मीडियावर हा एलिफंट रेस्क्यूचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. the_best_motivation_14 या इंस्टाग्राम हँडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो पाहून अनेकांनी यावर भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत.