निवृत्तीच्या 3 दिवस आधी केली बदली; कर्मचाऱ्याने लिहिले कठोर शब्दात रेल्वेला पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वे आपल्या कर्मचाऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी नावाजलेली आहे. सध्या भारतीय रेल्वेमध्ये 11 लाख पेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत. पण रेल्वेच्या प्रशासनाकडून प्रत्येक कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न असतो. परंतु हेच प्रशासन पूर्व मध्य रेल्वे मध्ये असणाऱ्या  बिलासपूर विभागाच्या मुख्य संवादशाखा अभियंता असलेल्या KP आर्या  निवृत्तीपूर्वी फक्त तीन दिवस आधी उत्तर रेल्वेच्या मुख्य कार्यालयात बदली केल्यामुळे अडचणीत आले आहे.

KP आर्या यांना रेल्वे प्रशासनाने दिल्ली येथील उत्तर रेल्वेच्या मुख्यालयात पदोन्नतीवर आधारित बदली केल्याचे कळवले आहे. व यानुसार त्यांना 28 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथील मुख्यालयात पदभार स्वीकारण्यास सांगितले आहे. परंतु KP आर्या हे 30 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे फक्त तीन दिवसासाठी माझी बदली का करण्यात आली असा आरोप KP आर्या यांनी केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी तक्रार देखील दाखल केली आहे.

त्यात त्यांनी लिहिली की, ” 30 नोव्हेंबर रोजी माझी निवृत्ती होणार असून रेल्वे विभागाने तीन दिवस आधी माझी बदली केली आहे. हा शुद्ध वेडेपणा आहे. एक अधिकाऱ्याने ज्याने आयुष्यभर एक IP (भारतीय रेल्वेची) सेवा केली त्याच्या निवृतीच्या वेळी शेवटच्या आठवड्यात बदली केली जाते. आणि शेवटच्या वेळी त्याला त्रास दिला जातो हा निव्वळ वेडेपणा आहे.” अश्या शब्दात त्यांनी रेल्वेला पत्र लिहिले आहेत.