हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या भारतामध्ये GBS व्हायरसने थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे नागरीक चिंतेत असताना जागतिक आरोग्य संघटनाने (WHO) एका नव्या आजाराची माहिती दिली आहे. हा आजार जगासाठी वाढते आरोग्य संकट ठरू शकतो असेही आरोग्य संघटनेने म्हटले आहे. या व्हायरसचा धोका भारतात वाढत असून त्वरित खबरदारी घेण्याची गरज WHO ने व्यक्त केली आहे.
काय आहे एन्सेफलायटीस?
WHO च्या माहितीनूसार, एन्सेफलायटीस (Encephalitis) हा एक गंभीर मेंदूज्वर असून तो कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला प्रभावित करू शकतो. हा आजार अचानक मेंदूवर हल्ला करून रुग्णाला कोमामध्ये नेऊ शकतो. एन्सेफलायटीस म्हणजे मेंदूला होणारी सूज होऊ. जी दोन प्रमुख कारणांमुळे उद्भवू शकते. त्यातील एक म्हणजे संसर्गजन्य मेंदूज्वर आणि दुसरा ऑटोइम्यून एन्सेफलायटीस. ज्यामुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.
भारतामध्ये रुग्णसंख्या वाढीचा धोका
२०२४ च्या आकडेवारीनुसार, देशातील २४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जपानी एन्सेफलायटीसची १,५४८ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. उन्हाळा आणि पावसाळ्यात या आजाराचा प्रसार अधिक होतो. उष्णकटिबंधीय हवामान, दूषित पाणी आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव ही या आजाराच्या वाढीमागची प्रमुख कारणे आहेत.
WHO चा इशारा आणि तज्ज्ञांची चिंता
WHO आणि एन्सेफलायटीस इंटरनॅशनलच्या प्रमुख डॉ. अवा ईस्टन यांच्या मते, “जर या आजारावर वेळीच उपाय केले नाहीत, तर येत्या काळात एन्सेफलायटीसमुळे मृत्यू आणि अपंगत्वाचे प्रमाण वाढू शकते.” त्यामुळे सरकार, वैद्यकीय तज्ज्ञ आणि संशोधकांनी एकत्रितपणे काम करून यावर प्रभावी उपाय शोधण्याचे आवाहन WHO ने केले आहे.
रोगापासून बचाव कसा करावा?
लसीकरण करणे: जपानी एन्सेफलायटीससाठी प्रभावी लस उपलब्ध आहे.
डासांवर नियंत्रण: डासांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी स्वच्छता राखणे आवश्यक आहे.
वेळीच उपचार: ताप, अस्वस्थता, भूलथाप, फिट्स यांसारखी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.