सरसकट एन्काउंटरच्या नावाखाली दिवाळी साजरी करणे चुकीचे – नीलम गोऱ्हे

0
41
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । हैदराबादमधील २६ वर्षीय डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिला जाळण्याचे घृणास्पद कृत्य करणाऱ्या चारही आरोपींचा हैदराबाद पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. त्यानंतर सर्वस्तरातून पोलिसांचे कौतुक केले जात आहे. परंतु ”या प्रकारणातील आरोपी हे खरे होते की नाही हे न्याय पद्धतीने सिद्ध झाले नसल्याने याबाबत शंकेला जागा निर्माण होते त्यामुळे प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी” असे मत शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले होते.

दरम्यान ”या एन्काऊंटरमुळे पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे एन्काऊंटर केले कि घडवले याची केंद्राने चौकशी करायला हवी. जे घडलं त्यावर पडदा टाकण्यासाठी हे केलं गेलं आहे का?,” असा सवाल विचारत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलीस एन्काऊंटरमध्ये आज ठार झाले आहेत. घटनास्थळाची तपासणी करण्यासाठी त्यांना नेण्यात आले होते. तेव्हा पळून जाण्य़ाचा प्रयत्न करताना त्यांचा पोलिसांकडून खात्मा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here