शेती पंपाच्या नवीन वीज कनेक्शनसाठी 5 हजारांची लाच घेताना अभियंता रंगेहाथ ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

वाठार येथील वीज कंपनीच्या कार्यालयातून शेतकऱ्यांना नविन कनेक्शन देणे सुरू आहे. त्यातंर्गत वाठारच्या वीज कंपनीच्या कार्यालयात तेथील शेतकऱ्यांना अर्ज केला होता. त्यापैकी एका शेतकऱ्याला नविन वीज कनेक्शन देण्यासाठी राहुल अशोक सोनवले (वय -३८ वर्षे, पद-कनिष्ठ अभियंता) यांनी पाच हजारांची मागणी केली. त्यानुसार ती रक्कम आज देतो असे त्या शेतकऱ्याने सांगितले होते. त्यानुसार आज पाच हजारांची लाच घेताना राहुल सोनवले यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

एका 47 वर्षीय शेतकऱ्याने लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपाधीक्षक अशोक शिर्के यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक अविनाश जगताप, हवालदार ताटे, येवले यांना वाठार येथे जावून सापळा रचला. ठरल्या प्रमाणे संबधित शेतकऱ्याने लाचेची ठरलेली रक्कम सोनवले यांच्याकडे दिली. त्याच लाच लुचपत प्रतिबंध विभागाने छापा टाकून त्यास अटक केली.

वाठार येथील एमएसईबी कार्यालयात ही कारवाई करण्यात आला. पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. कारवाईतील रकमेची पडताळणी करून सोनवलेवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशीरापर्यंत सुुरु होती.

Leave a Comment