लंडन । भारतातील शेतकऱ्यांना आता देशाबाहेरुनही चांगला पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘जो बोले सो निहाल’ म्हणत आता शेतकरी आंदोलनात इंग्लंडच्या एका माजी क्रिकेटपटूनेही आता उडी घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. या क्रिकेटपटूने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कृषी कायदा बदलण्याची मागणी केली आहे. या क्रिकेटपटूचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे.
हा इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू म्हणजे माँटी पनेसार. माँटी पनेसारने आता शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर पनेसारने एक व्हिडीओ बनवला असून त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅगही केलला आहे. या व्हिडीओमध्ये पनेसारने लिहिले आहे की, ” आता तुम्हाला तुम्हीच घेतलेला निर्णय बदलण्याची वेळ आलेली आहे. देशातील शिख बांधव तुमच्याकडे त्यासाठी आले आहेत, जोपर्यंत तुम्ही हा निर्णय बदलत नाही तोपर्यंत ते तुमच्याकडे येतच राहतील.”
Bole So Nihal Sat Sri Akal "Whoever utters, shall be fulfilled." Sikh slogan or jaikara shout of victory or triumph which means one will be blessed eternally who says that God is the ultimate truth @narendramodi @BBCNews @SkyNews @ndtv #FarmersProtestDelhi2020 #FarmerPolitics pic.twitter.com/ff3oxPmFSG
— Monty Panesar (@zkp_scroll) December 7, 2020
नव्या कृषी कायद्याविरोधात हरयाणा आणि पंजाबचे शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांविरोधात ‘बळाचा वापर’ करण्याच्या भाजप सरकारचा निषेध करत आपले पुरस्कार परत करण्याचा निर्णय या खेळाडूंनी घेतला आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला दिवसेंदिवस क्रीडा क्षेत्रातूनही चांगलाच पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली होती. या शेतकऱ्यांच्या हाकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगनेही या बंदला पाठिंबा देत एक ट्विट केले आहे. शेतकऱ्यांबाबत हरभजनने केलेले ट्विट आता चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे.
Time to revert your decision @narendramodi Singhs will keep coming at you, until you make the amendments @sikhchannel @PTC_Network @harbhajan_singh @YUVSTRONG12 @akaalchannel @KTVU @BritAsiaTV @PTC_Network @ZeePunjab @BBCNews @SkyNews @panjabradio_ @MailOnline #FarmersWithModi pic.twitter.com/bAcXxAmydY
— Monty Panesar (@zkp_scroll) December 7, 2020
हरभजनने यावेळी शेतऱ्यांबाबत एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये हरभजने लिहिले आहे की, ” शेतकऱ्यांमुळेच भारत देश आहे.” यानंतर हरभजनने भारताचा झेंडा पोस्ट केला आहे. हरभजनच्या या पोस्टला चाहत्यांनी चांगलाच पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हरभजनचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे.
बॉलिवूडवर कोरोनाचा कहर, क्रिती सेननलाही झाली कोरोनाची लागण
सविस्तर वाचा-👉 https://t.co/6lyypEknxc#KritiSanon @kritisanon #bollywood #coronavirus #COVID19India #CoronaVaccine #COVID19 #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 8, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’