पर्यावरण संगोपनासाठी सरकारची नवी योजना, तब्बल 7500 शाळांमध्ये राबवणार पर्यावरण सेवा योजना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आपल्या आयुष्यात निसर्गाला म्हणजेच पर्यावरणाला खूप जास्त महत्त्व आहे. या पर्यावरणामुळेच आज आपण जिवंत राहू शकतो. कारण पर्यावरणातील झाडांमुळेच ऑक्सिजन तयार होतो आणि तो ऑक्सिजन घेऊनच आज आपण जिवंत आहोत. त्याचप्रमाणे पर्यावरणातील इतर अनेक अशा गोष्टी आहेत, ज्यामुळे त्याचा फायदा आपल्याला दैनंदिन जीवनात नेहमीच होत असतो. याच पर्यावरणाचे महत्त्व आजकाल शाळकरी मुलांना पटवून दिले जाते जेणेकरून पुढील पिढीमध्ये ते या पर्यावरणाचे संरक्षण करतील आणि त्याची काळजी घेतील.

अशातच राज्यात पर्यावरण सेवा योजनेच्या निमित्ताने शाळांमध्ये काही योजना राबविण्यात आल्या. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात आता राज्यातील जवळपास 7500 शाळांमध्ये सेवा योजना राबवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. याबाबतचा निर्णय देखील सरकारने जाहीर केला आहे.

शालेय जीवनामध्येच विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे फायदे समजावेत. पर्यावरण आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे त्याचे महत्त्व समजावे. त्याचप्रमाणे पर्यावरणाचे संरक्षण करता यावे. या सगळ्या गोष्टी कृतिद्वारे त्यांना समजाव्यात. यासाठी राज्य सरकारने राज्यात पर्यावरण सेवा योजना राबवण्यात आलेली आहे. सुरुवातीस आपल्या राज्यातील जवळपास 12000 जिल्ह्यातील 50 शाळांमध्ये ही योजना राबवले देण्यात आलेली होती. परंतु आता या योजनेचा दुसरा टप्पा चालू झालेला आहे. पुढील पाच वर्षात राज्यातील 7500 शाळांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे.

या योजनेमध्ये आपल्या स्थानिक पर्यावरणात असलेल्या ज्या काही समस्या आहेत. त्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभाग घेऊन. त्याचप्रमाणे कृती करून समजून घेता येतील आणि त्याबाबत नक्की काय उपाययोजना करता येईल. या गोष्टीची माहिती देखील त्यांच्याकडून घेता येईल. आणि त्यांना प्रोत्साहन देता येईल. त्याचप्रमाणे निसर्ग आणि मानव यांच्यातील नाते अधिक आढळ करण्याचा उद्देश देखील या योजनेचा आहे. जेणेकरून येणाऱ्या पिढीला आपल्या पर्यावरणाचे महत्त्व समजेल.

आता या योजनेमध्ये राज्यातील महानगरपालिका नगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत तसेच इच्छुक शाळा अर्ज करू शकतात. सरकारकडून ही योजना राबवण्यासाठी तब्बल 5 कोटी 87 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शाळांनी या सरकारच्या पर्यावरण योजनेमध्ये सहभाग घ्या. जेणेकरून तुमच्या पर्यावरणाचे देखील रक्षण होईल आणि येत्या नवीन पिढीला देखील पर्यावरणाचे महत्त्व समजेल.