हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (EPF Withdrawal Rules) नोकरदार वर्गासाठी पीएफ हा शब्द चांगला ओळखीचा आहे. त्यांच्या मासिक पगारातून पीएफ (पेन्शन) म्हणून एक निश्चित रक्कम कापली जाते. हे लोक पेन्शन फंडात एकूण १२% योगदान देतात आणि ते ज्या कंपनीसाठी काम करत आहेत ती कंपनी अर्थात नियोक्तासुद्धा योगदान देत असतो. कर्मचारी वर्गासाठी ही एकप्रकारची गुंतवणूक आणि बचत दोन्ही आहे.
पीएफमध्ये चांगला परतावा मिळतो. शिवाय कर्मचारी गरजेच्या वेळी या खात्यात जमा केलेली रक्कम अंशतः काढू शकतात. हे आंशिक पैसे काढणे करमुक्त आहे. (EPF Withdrawal Rules) असे पीएफ खात्यातून पैसे काढण्याचे बरेच नियम आहेत. ज्याविषयी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. अन्यथा एका चुकीमुळे तुमचा पीएफ नाकारला जाऊ शकतो. चला तर जाणून घेऊ पीएफ खात्यातून पैसे काढण्याचे नियम कोणते?
पीएफ मधून पैसे काढण्याची मर्यादा (EPF Withdrawal Rules)
EPF खात्यातून पैसे काढण्याची विशेष मर्यादा नसते. अर्थात एखादी व्यक्ती नोकरीदरम्यान गरजेनुसार या फंडातून काही आंशिक रक्कम काढू शकते. तसेच तुम्ही नोकरी करत असाल तर २ महिन्यांनी तुम्ही संपूर्ण पीएफची रक्कम काढू शकता. याशिवाय निवृत्तीनंतरही एकाच वेळी संपूर्ण रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध असते. यामध्ये पेन्शनचा पर्यायही उपलब्ध असतो. मात्र, हा पर्याय ऐच्छिक असू शकतो.
जर तुम्ही ५ वर्षे EPF खात्यात योगदान दिले असेल आणि ५ वर्षापूर्वीच पैसे काढले असतील तर त्याला १०% TDS भरावा लागतो. (EPF Withdrawal Rules) तसेच ईपीएफ सदस्य स्वतःच्या किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या उपचारासाठी यातून अधिकाधिक १ लाख रुपये काढू शकतो. यापूर्वी त्याची कमाल मर्यादा ५० हजार रुपये होती.
मात्र, या नियमात १० एप्रिलपासून बदल झाला आहे. या सुविधेसाठी आता योगदानाच्या कालावधीवर कोणतेही बंधन नाही. तसेच जर तुम्ही ३ वर्षांसाठी पीएफमध्ये योगदान दिले असेल, तर तुम्ही घर वा जमीन खरेदी करताना या फंडातून ९०% रक्कम काढू शकता. मात्र या सुविधेचा तुम्ही केवळ एकदाच वापर करू शकता.
होम रिनोव्हेशन – समजा एखाद्या कर्मचाऱ्याने ५ वर्ष पीएफसाठी योगदान दिले. (EPF Withdrawal Rules) तर तो कर्मचारी आपल्या घराच्या नूतनीकरणासाठी त्याच्या मासिक पगाराच्या १२ पट रक्कम काढू शकतो. या सुविधेचा वापर २ वेळा केला जाऊ शकतो.
लोन रिटर्न – याशिवाय एखाद्या कर्मचाऱ्याने किमान १० वर्ष पीएफमध्ये योगदान दिले असेल, तर होम लोनच्या परतफेडीसाठी हा कर्मचारी ३६ महिन्यांचा पगार काढून घेऊ शकतो. (EPF Withdrawal Rules) ही सुविधा सेवा कालावधीत केवळ एकदा वापरण्याची संधी मिळते.
पूर्ण PF रक्कम कधी काढता येईल?
तुम्ही ज्या कंपनीसाठी काम करत आहात तिथून नियतकालीन निवृत्तीनंतर तुम्हाला पीएफ फंडाची संपूर्ण रक्कम काढता येते. तसेच नोकरीचा कालावधी संपल्यावर तुम्ही तुमच्या EPF शिल्लकपैकी ७५% रक्कम काढू शकता. (EPF Withdrawal Rules) तसेच या कालावधी पुढील २ महिने बेरोजगार राहिल्यास तुम्ही २५% रक्कम काढून घेऊ शकता.