हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन EPFO 3.0। PF बाबत एक मोठी अपडेट समोर येतेय. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO ) येत्या आठवड्यात त्यांचे अपग्रेड केलेले प्लॅटफॉर्म, EPFO ३.० लाँच करण्याची तयारी करत आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी यापूर्वीच याबाबत घोषणा केली होती की मे ते जून २०२५ दरम्यान EPFO 3.0 लाँच होणार आहे. याद्वारे एटीएममधून पीएफ काढणे, डिजिटल सुधारणा यासारखी अनेक बँकिंग कामे सोपी आणि पारदर्शक होतील. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता PF खात्याचे पैसे ATM मधूनही काढता येतील. EPFO 3.0 अंतर्गत नेमके कोणते बदल होतील? ग्राहकांना काय फायदे होतील हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
EPFO 3.0 ची वैशिष्ट्ये काय असू शकतात? EPFO 3.0
EPF निधीचे पैसे ATM मधून काढणे
EPFO 3.0 लाँच झाल्यानंतर EPF सदस्यांना नियमित बँक व्यवहारांप्रमाणेच या निधीचे पैसेही थेट एटीएममधून काढण्याची परवानगी दिली जाऊ शकते.भविष्यात जनरल प्रॉव्हिडंट फंड (जीपीएफ) आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) साठी देखील ही सुविधा लागू केली जाऊ शकते असे म्हटले जात आहे.
पैसे काढणे सोपे होईल-
ईपीएफओ ३.० लागू झाल्यानंतर, पीएफ काढण्याची प्रक्रिया खूपच सोपी आणि जलद होईल. कारण मॅन्युअल कामाची आवश्यकता कमी होईल. क्लेम प्रोसेसिंग पूर्णपणे ऑटोमेटेड होईल. सध्या, ऑटो-क्लेम सेटलमेंट मर्यादा १ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात आली आहे.
डिजिटल प्रोफाइल अपडेट आणि सुधारणा
ईपीएफओ ३.० द्वारे, सदस्य त्यांच्या युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) द्वारे ऑनलाइन नाव, जन्मतारीख, लिंग, राष्ट्रीयत्व, पालकांचे नाव, वैवाहिक स्थिती आणि नोकरी सुरू करण्याची तारीख यासारखे तपशील अपडेट करू शकतील. म्हणजेच, सदस्यांना इतर कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता राहणार नाही.
OTP -आधारित पडताळणी
ईपीएफओ पारंपारिक फॉर्म-आधारित प्रक्रिया बदलून ग्राहकांच्या माहितीसाठी OTP -आधारित अपडेट्स आणेल अपेक्षा आहे.
सुधारित तक्रार निवारण
नव्या सिस्टीम मध्ये जलद आणि अधिक प्रतिसाद देणारी तक्रार निवारण यंत्रणा समाविष्ट होण्याची शक्यता आहे.




