हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रानं कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर मिळणाऱ्या व्याजदरात कपात केली आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनेने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ०.१५ टक्के कपात करून ८.५०% व्याजदर घोषीत केला आहे.
संघटनेने केलेल्या गुंतवणुकीवर अपेक्षित परतावा न मिळाल्याने यंदा व्याजदरात कपात केल्याचं म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं जवळपास ६ कोटी कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. गेल्या आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर ८.६५% व्याज दिले होते.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.