हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EPFO ने सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. आता ईपीएफओ सदस्यांना डिजीलॉकरद्वारेच अनेक महत्त्वाचे डॉक्युमेंट्स डाउनलोड करता येतील. ईपीएफओकडून आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत त्यासाठीची सुविधा सुरू करण्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आता EPFO च्या सदस्यांना डिजीलॉकरद्वारे UAN कार्ड, पेन्शन पेमेंट ऑर्डर आणि स्कीम सर्टिफिकेट डाउनलोड करता येतील. हे लक्षात घ्या कि, सदस्यांसाठी EPFO कडून बहुतांश सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या ऑनलाइन सेवांमुळे, ग्राहकाला ऑफिसमध्ये फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. तसेच यामुळे ईपीएफओवरील कामाचा ताणही कमी होईल.
ट्विट करत दिली माहिती
आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत ईपीएफओकडून या सुविधेबाबतची माहिती देण्यात आली आहे. यावेळी ईपीएफओने म्हंटले कि, “आता सदस्य डिजीलॉकरद्वारे UAN कार्ड, पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) आणि योजना प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतील.” याशिवाय, डिजीलॉकरवरूरील सर्व कागदपत्रे डाउनलोड करता येतील, असेही या ट्विटमध्ये लिहिले आहे.
असा होईल फायदा
ईपीएफओ सदस्यांसाठी UAN क्रमांक, पेन्शन पेमेंट ऑर्डर आणि ईपीएस सर्टिफिकेट हे अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. डिजीलॉकरच्या मदतीने आता ते सहजपणे डाउनलोड करता येणार आहेत. पगारदार लोकांसाठी UAN हे एक अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. याद्वारे सदस्यांना त्यांचे EPFO खाते ट्रॅक आणि मॅनेज करता येतील.
पेन्शन पेमेंट ऑर्डर हा एक युनिक 12-अंकी नंबर आहे, जो पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन मिळवण्यासाठी गरजेचं आहे. त्याचप्रमाणे, ईपीएस सर्टिफिकेट हे ईपीएफओकडून जारी केले जाणारे डॉक्युमेंट आहे, ज्यामध्ये भविष्य निर्वाह निधी सदस्याच्या सर्व्हिस डिटेल्स असतात. याशिवाय सदस्यांनी किती वर्षे काम केले, कुटुंबाची माहिती आणि नॉमिनी डिटेल्स आहेत.
1951 मध्ये झाली EPFO ची स्थापना
हे जाणून घ्या कि, EPFO ची स्थापना 15 नोव्हेंबर 1951 रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अध्यादेशाद्वारे करण्यात आली. यानंतर 1952 मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायद्याने त्याची जागा घेतली. तर डिजीलॉकर हा डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाचा (MeitY) एक प्रमुख उपक्रम आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.epfindia.gov.in/
हे पण वाचा :
PM Kisan चा 12 वा हप्ता हवा असेल तर उद्यापर्यंत करावी लागेल eKYC, जाणून घ्या संपूर्ण पद्धत
बँकेची overdraft facility काय आहे ??? त्याचा फायदा कसा घ्यावा हे समजून घ्या !!!
Multibagger Stock : ‘या’ केमिकल कंपनीच्या शेअर्सने गुतंवणूकदारांना केले मालामाल !!!
SBI देत आहे 6,000 रुपये जिंकण्याची संधी !!! या मेसेजमागील सत्य जाणून घ्या
Gold Price Today : सोन्याच्या दरात वाढ तर चांदीमध्ये घसरण, आजचे नवीन दर तपासा !!!