EV Car Loan : गेल्या वर्षभरापासून भारतीय बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांचे महत्व आणि डिमांड चांगलीच वाढली आहे. पेट्रोल- डिझेलचा खर्च वाचवण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याला ग्राहक पसंती दाखबत आहेत. सरकार सुद्धा इलेक्ट्रिक गाडयांना प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे मार्केट मध्ये अनेक वाहन निर्माता कंपन्या आपल्या नवनवीन गाड्या इलेक्ट्रिक स्वरूपात लाँच करत आहेत. मात्र इलेक्ट्रिक वाहनांची किंमत जास्त असल्याने अनेक ग्राहक इच्छा असूनही खरेदी करू शकत नाही. परंतु आता या समस्येवर देशातील आघाडीची बँक असलेल्या SBI ने मार्ग काढला आहे. त्यानुसार स्टेस्ट बँक ऑफ इंडिया इलेक्ट्रिक कार खरेदीवर १००% कर्ज देत आहे. त्यामुळे तुम्ही खिशात पैसे नसतानाही तुम्हाला हवी ती इलेक्ट्रिक कार खरेदी करू शकता.
किती आहे व्याजदर – EV Car Loan
ग्राहकांना त्यांना हवी ती इलेक्ट्रिक कार खरेदी करता यावी यासाठी स्टेस्ट बँक ऑफ इंडियाने इलेक्ट्रिक कार खरेदीसाठी विशेष योजना सुरू केली आहे. यानुसार, तुम्ही कारच्या ऑन-रोड किमतीच्या 90% पर्यंत कर्ज घेऊ शकता. तर काही खास मॉडेल्सवर 100% कर्ज सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. यासाठी 21 ते 70 वर्षे वयोगटातील कोणताही ग्राहक इलेक्ट्रिक कार खरेदीसाठी कर्ज घ्यायला अर्ज करू शकतो. हे कर्ज तुम्हाला ३ ते ८ वर्षाच्या कालावधीसाठी मिळेल. SBI सामान्य वाहन कर्जाच्या तुलनेत इलेक्ट्रिक कार कर्जावरील व्याजावर 0.25 टक्के सूट आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सध्या सामान्य कारवर 8.85 ते 9.80 टक्के व्याजदराने कर्ज देत आहे. तर इलेक्ट्रिक कारवरील कर्जाचा हा व्याजदर 8.75 ते 9.45 टक्के इतका आहे.
जर तुम्ही पगारदार कर्मचारी असाल म्हणजेच कोणत्या तरी ठिकाणी नोकरी करत असाल आणि इलेक्ट्रिक कार खरेदीसाठी कर्ज (EV Car Loan) घेणार असाल तर तुमच्याकडे मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट असावे. याशिवाय तुमच्या ओळखीचा पुरावा, तुमचा पत्ता, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो इत्यादी कागदपत्रे बँकेकडे जमा करावी लागतील. जर तुम्ही शेती करत असाल तर तरी सुद्धा तुम्हाला हीच कागदपत्रे बँकेकडे द्यावे लागतील. त्यानंतर बँकेकडून तुमचे कर्ज मंजूर करण्यात येईल.