कर्मचाऱ्यांच्या संपातही लालपरी रस्त्यावर सुसाट 

 

 

औरंगाबाद – एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी 8 नोव्हेंबर पासून संपावर आहेत. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पडल्यानंतर औरंगाबाद विभागात टप्प्याटप्प्याने बस सेवा पूर्वपदावर येत आहे. काल दिवसभरात विविध मार्गांवर 104 बस मधून 3 हजार 571 प्रवाशांनी प्रवास केला. शिवाय पुणे, नाशिक मार्गावर 23 शिवशाही सोडण्यात आल्या होत्या. येत्या काही दिवसात बहुतांश मार्गावर बससेवा सुरू होणार असल्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास थांबणार आहे.

31 डिसेंबर रोजी 42 व 1 जानेवारी रोजी 72 बसेस धावल्या होत्या. 2 जानेवारी रोजी 128 तर 3 जानेवारी रोजी 104 बसने 252 फेऱ्या केल्या. त्यातून एकूण 3571 प्रवाशांनी प्रवास केला. यात 23 शिवशाही तर 81 लालपरींचा समावेश आहे. जालना, बीड, गेवराई, तुळजापूर, पुणे, उस्मानाबाद, आंबेजोगाई, औराळा, नाशिक, कन्नड, सिल्लोड, बुलढाणा, अहमदनगर, शहागड, शेवगाव, गंगापूर, कोपरगाव, लासूर, सिल्लोड, चिंचोली, वैजापूर आधी मार्गांवर लालपरीची सेवा सुरू झाली आहे.

औरंगाबाद विभागात आतापर्यंत 750 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. जसे जसे कर्मचारी कामावर हजर होत आहेत. त्या त्या पद्धतीने लाल्परी च्या फेऱ्यात वाढ करण्यात येणार आहे.