कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील
मुलांच्या जीवनात संघर्ष असल्याशिवाय तो यशस्वी होत नाही. परिस्थिती ही प्रत्येक गोष्टीचे मोल काय आहे, याची जाणीव करून देते. आपल्या मुलांना सर्व गोष्टी, वस्तू संघर्ष न करता मिळाल्यास त्याची किमंत त्यांना कळत नाही. त्यामुळे संघर्षातून घडलेला प्रत्येकजण यशस्वी होतोच. परंतु तो विकासात्मक व सकारात्मक असतो, असे मार्गदर्शन कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी केले.कराड येथे वेणूताई चव्हाण सभागृहात सदाशिवगड येथील यशवंत शिक्षण संस्थेच्या
वार्षिक स्नेहसंमेलन उदघाटन प्रसंगी ते कार्यक्रमात पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमास यशवंत शिक्षण संस्थेचे सचिव डी. ए. पाटील हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. सुधीर जगताप, दैनिक सकाळचे उपसंपादक हेमंत पवार, व्हाईस आॅफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष व हॅलो महाराष्ट्रचे उपसंपादक विशाल पाटील, प्रदीप राऊत, मुख्याध्यापक जी. बी. देशमाने, के. आर. साठे, ए. आर. मोरे, व्ही. एच. कदम, डी. पी. पवार यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेचे सचिव डी. ए. पाटील म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्याच्यात अनेक गुण असतात. या कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन हे व्यासपीठ आहे. यशवंत शिक्षण संस्थेचा आलेख दिवसेंन दिवस वाढत आहे. आण्णांनी घालून दिलेल्या वाटेवर संस्था चालत आहे. संस्था नेहमीच शिक्षणाबरोबर परिपूर्ण विद्यार्थी घडवण्यासाठी कटिबद्ध आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. डी. चव्हाण यांनी केले. सुत्रसंचलन व्ही. बी. मोहिते यांनी केले. आभार डी. पी. पवार यांनी मानले.