भारतीय लष्करातून पळून जाऊन तो अतिरेक्यांना मिळाला आणि आज मारला गेला

Jahur Thokar terrorist
Jahur Thokar terrorist
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

श्रीनगर | दहशतवादी कारवायांमुळे नेहमी चर्चेत असणार्या जम्मू काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यात भारतीय लष्कराने ३ अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये भारतीय लष्करातून पळून गेलेला आणि अतिरेकी बनलेल्या जहूर ठोकर याचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी भारतीय लष्कराला पुलवामा जिल्ह्यामधील खारपुरा येथे दहशतवादी लपून बसले असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार जवानांनी कॉर्डन अंड सर्च ऑपरेशन राबवले असता दबा धरून बसलेल्या अतिरेक्यांनी लष्कराच्या जवानांवर गोळीबार केला. यावेळी प्रत्युत्तराखातर भारतीय जवानांनी केलेल्या हल्ल्यात हिजबुल कमांडर जहूर ठोकर याच्यासोबत ३ दहशतवादी मारले गेले.

जहूर ठोकर १७३ टेरीटोरिअल आर्मी चा सदस्य होता. २०१६ मध्ये त्याने भारतीय लष्करातून सर्विस रायफल घेऊन पलायन केले होते.