Excessive Salt Intake : जेवणात वरून मीठ खाता? तुम्ही स्वतःच देताय तुमच्या मृत्यूला आमंत्रण; पहा काय म्हणाले तज्ञ?

Excessive Salt Intake
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Excessive Salt Intake) कोणताही पदार्थ रुचकर आणि स्वादिष्ट बनवायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं असतं ते मीठ. जेवणात मिठाचं प्रमाण बरोबर असेल तर खाताना पदार्थ चविष्ट लागतो. मात्र, तेच मीठ जर चुकून कमी पडलं तर अळणी पदार्थ घशाखाली उतरत नाही. अशावेळी चवीचे पक्के असणारे लोक वरून मीठ घेऊन खातात. तुम्हालाही अशी सवय असेल तर सावधान!! ही एक सवय तुमच्या आरोग्याचं मोठं नुकसान करू शकते. वरून मीठ खाणे किंवा जास्तीचे मीठ खाणे आरोग्यासाठी केवळ हानिकारक नसून यामुळे मृत्यू देखील होऊ शकते असे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सांगितले आहे.

जागतिक आरोग्य संघटना कायम आपल्या आरोग्यासंदर्भात विविध महत्वाच्या सूचना देत असते. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने मीठ खाण्याबाबत अत्यंत महत्वाची माहिती प्रदान केली आहे. खासकरून अति प्रमाणात मिठाचं सेवन (Excessive Salt Intake) करणाऱ्यांसाठी ही माहिती उपयुक्त आहेत. जगभरात हृदय रोगाशी संबंधित आजार वाढल्याने जागतिक आरोग्य संघटनेने हा एक महत्त्वाचा इशारा दिला आहे, असे म्हणता येईल.

WHO ने काय सांगितलं?

WHO च्या तज्ञांनी केलेल्या अभ्यासात असे समोर आले आहे की, यूरोपमध्ये दररोज किमान १० हजार लोकांचा हृदयाशी संबंधित आजाराने मृत्यू होतोय. अर्थात वर्षभरात सुमारे ४० लाख लोकांचा हृदयविकाराने मृत्यू होतो. (Excessive Salt Intake) याचे कारण आहे प्रमाणापेक्षा जास्त मिठाचे सेवन. होय. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, मिठाचं प्रमाणापेक्षा अधिक सेवन केल्याने हे मृत्यू होत आहे. त्यामुळे मिठाच्या सेवनाचे प्रमाण किमान २५ टक्के कमी करायची गरज आहे. असे केल्यास २०३० पर्यंत ९ लाख मृत्यू रोखता येतील.

मृतांमध्ये पुरुषांचा सर्वाधिक समावेश

गेल्या काही वर्षातील रिपोर्ट पाहता, प्रमाणापेक्षा अधिक मीठ खाल्ल्याने (Excessive Salt Intake) रक्तदाब वाढून किंवा हृदयाशी संबंधित आजार होऊन झालेल्या मृतांमध्ये पुरुषांचा आकडा सर्वाधिक आहे. आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार, महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये हृदयरोगाने मरण्याचं प्रमाण अधिक असून हे प्रमाण २.५ इतके आहे.

नियमित किती मिठाचे सेवन करावे? (Excessive Salt Intake)

WHO च्या तज्ञांनी म्हटल्याप्रमाणे, अनेक देशात प्रतिदिन मिठाचं सेवन करण्याचं प्रमाण ५ ग्रॅमपेक्षा जास्त आहे. जे घातक आहे. आरोग्य संघटनेने सांगितले की, ५ ग्रॅम वा त्यापेक्षा कमी मीठ खाणे फायदेशीर ठरेल. अर्थात दिवसभरात केवळ १ चमचा किंवा त्यापेक्षा कमी मीठ खाल्ल्याने आरोग्याला हानी पोहोचणार नाही. प्रोसेस्ड फूड आणि स्नॅक्समध्ये मीठाचं सर्वाधिक प्रमाण असतं. त्यामुळे हे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे, असंही सांगण्यात आलं आहे.