शेतकऱ्यांमध्ये खळबळ : वाईत डॉक्टरांच्या बेमुदत संपामुळे 36 हजार पशुधन धोक्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

वाई तालुक्यातील सरकारी १२ आणी खाजगी ३२ जनावरांच्या डॉक्टरांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी आणी राज्य सरकारला वटणीवर आणण्यासाठी शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारल्याने ११७ गावातील ३६ हजार जनावरांचे आरोग्य धोक्यात सापडल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बेमुदत पुकारलेल्या या संपाचे निवेदन वाई तालुका पशुवैदकीय डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. बिपीन खरात यांनी वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदय कुसुरकर यांना दिले आहे.

याबाबतची माहीती अशी, वाई तालुक्यातील ११७ गावामधील शेतकऱ्यांकडे अंदाजे ३६ हजार जनावरे आहेत. हि जनावरे शेतीला जोड धंदा म्हणून दुधाचा फार मोठा व्यवसाय करुन येथील शेतकरी हे आपला दैनंदिन प्रापंचिक खर्च भागवुन मुलांचे शिक्षण करीत असतात दुध धंदा हा नगरी व्यवसाय असल्यामुळे तालुक्यातील घरा घरांमध्ये जनावरे आहेत. वेळप्रसंगी शेतकऱ्यांचे हे किमती पशुधन ऊपचाराविना धोक्यात येवू नये म्हणून राज्य सरकारच्या पशुवैदकीय विभागा मार्फत वाई तालुक्यातील ओझर्डे, शिरगाव, किकली, पाचवड, ऊडतेरे, बावधन, ऊळुंब, रेणावळे, वेलंग, बोपर्डी, मांढरदेव, केंजळ, सुरुर, कवठे या गावांमध्ये पशुवैदकीय दवाखान्यामध्ये १२ सरकारी डॉक्टरांच्या नेमणूका आहेत.

येथील आवश्यक असणारा दुध व्यवसाय सुरळीतपणे ठेवण्यासाठी या सरकारी डॉक्टरांन सोबतच खाजगी ३२ डॉक्टरही शेतकऱ्यांच्या गोठ्यात जाऊन सेवा देत असतात. यावरील सर्व डॉक्टरांच्या विविध मागण्या राज्य सरकारच्या दरबारात प्रलंबित आहेत. त्या मागण्यांची पुर्तता करुन घेण्यासाठी आणी राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी वाई तालुक्यातील सरकारी १२ आणी खाजगी ३२ अशा ऐकुन ४४ डॉक्टरांनी एकत्रीत येऊन शुक्रवार पासून बेमुदत संप पुकारल्याने वाई तालुक्यातील शेतकऱ्यांचे ३६ हजार पशुधन धोक्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.