हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Flipkart Sale : आता अवघ्या काही दिवसांवर नवीन वर्ष येणार आहे. याच दरम्यान आता ई-कॉमर्स साइट असलेल्या फ्लिपकार्टवर ईयर-एंड सेल सुरू झाला आहे. 31 डिसेंबरपर्यंत सुरू असणाऱ्या या सेलमध्ये ग्राहकांना अनेक गॅजेट्सवर जबरदस्त ऑफर्स आणि डिस्काउंट दिले जात आहेत. यामध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि इअरबड्स यांसारख्या उत्पादनांच्यावर मोठी सवलत मिळू शकेल. चला तर मग फ्लिपकार्टवरील या ऑफर्सविषयी जाणून घेउयात…
जर आपल्याला Apple iPhone 11 खरेदी करायचा असेल तर आता आपल्यासाठी चांगली संधी चालू आली आहे. कारण, या Flipkart Sale मध्ये आपल्याला तो जवळपास 38,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. फ्लिपकार्टवर, iPhone 11 चा 64GB व्हेरिएंट 39,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. तसे पहिले तर या फोनची किंमत 43,900 रुपये आहे. मात्र इथे ग्राहकांना यावर 4,000 रुपयांची सवलत मिळू शकेल. याव्यतिरिक्त, Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवरही अतिरिक्त 5 टक्के सूट मिळेल.
या Flipkart Sale मध्ये boAt Airdopes 131 ग्राहकांना 1,299 मध्ये खरेदी करता येईल. तसे पहिले तर त्याची किंमत 2,990 रुपये आहे. हे लक्षात घ्या कि, हे इअरबड्स 60 तासांपर्यंतचा बॅटरी बॅकअप देतात. यासोबतच कनेक्टिव्हिटी ब्लूटूथ 5.1 चा सपोर्टही दिला गेला आहे.
या सर्व व्यतिरिक्त, या Flipkart Sale मध्ये सॅमसंग वॉच 4 29,999 रुपयांऐवजी 11,349 रुपयांना मिळेल. या स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग सपोर्ट देखील दिला गेला आहे.
या Flipkart Sale मध्ये iPhone 13 वर 7,900 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे. या फोनची खरी किंमत 69,900 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टवरील या सेलमध्ये सध्या तो 61,999 रुपयांना मिळत आहे. यासोबतच ग्राहकांना Flipkart Axis Bank कार्डवर 5 टक्के कॅशबॅक देखील मिळेल.
त्याचप्रमाणे,या Flipkart Sale मध्ये Infinix Note 12 चा 4GB + 64GB व्हेरिएंटचा स्मार्टफोन 9,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ज्याची मूळ किंमत 15,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G88 प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा देखील देण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/fashion-end-of-season-sale-store
हे पण वाचा :
IDBI Bank च्या ‘या’ FD वर मिळेल 7.60% व्याज, जाणून घ्या अधिक तपशील
Bank Loan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता फक्त मिस कॉल अन् मेसेज द्वारे अशा प्रकारे मिळेल कृषी लोन
New Business Idea : जास्त भांडवलाची गरज नसलेल्या ‘या’ व्यवसायाद्वारे मिळवा लाखो रुपये, सरकारकडूनही मिळेल मदत
Aadhar Card 10 वर्षांपेक्षा जुने झाले आहे ??? अशा प्रकारे करा अपडेट
Gold Price Today : सोने झाले स्वस्त, चांदी महागली, नवीन दर तपासा