हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । जगभरात सगळे आपापल्या कामात मग्न असतात. धावपळीच्या या युगात ना कोणी कोणाला भेटत. की ना कोणाशी जाऊन एकांतात गप्पा मारल्या जात. कामाच्या टेन्शन मूळ हे सारं घडत आहे. सर्वजण मोबाइल च्या माध्यमातून संवाद साधत आहेत. सगळे लोक आपला जास्तीत जास्त वेळ हा मोबाईल वरती घालवतात. मित्र मैत्रिणींना, नातेवाइकांना भेटण्यासाठी लोक आत्ता व्हर्चुअल पद्धतीचा उपयोग करून एकमेकांच्या संपर्कात राहणे पसंत करत आहेत. कोरोना महामारीच्या काळात तर मोबाईल वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी शालेय शिक्षणाची सुरुवात पण मोबाईल वरच सुरू झाली आहे. पण या मोबाईल च्या अति वापरामुळे कोणी अपंग झाल्याचे ऐकले आहे का नाही न पण अशी घटना घडली आहे आयरलँडमध्ये
मोबाइल च्या अतिवापरामुळे कधी कोणाला आपला हात कापावा लागला असेल असं ऐकले नसेल परंतु आयर्लंडमध्ये मध्ये राहणारी ३५ वर्षीय एमी लोरीन ला आपल्या मोबाइल च्या अतिवापरामुळे हात गमवावा लागला तिने घडलेल्या चुकीबद्दलची स्टोरी शेअर केली आहे. ती मोबाईल वर दिवसेंदिवस चाटिंग करत असे जास्त वेळ ती मोबाईल वर टाइप करण्यात घालवत असे. २०१८ मध्ये तिचा हात सुजू लागला होता त्यानंतर मात्र असाच सुजलेला हात एक वर्षभर राहिला तिने त्याकडे दुर्लक्ष केले. तिला कल्पना ही आली नाही की मोबाईल च्या अतिवापरामुळे तिच्या हातावर सूज आली ते जेव्हा सूज दिवसेंदिवस वाढत जाऊ लागली तेव्हा तिने डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा निर्णय घेतला. जेव्हा एमीची बायोप्सी करण्यात आली तेव्हा तिला तो आजार कॅन्सर मुळे झाल्याचे कळले.तिच्या हातावर असलेली सूज हा कॅन्सर चा एक भाग होता आणि हातामधून शरीराच्या इतर भागात तो कॅन्सर पसरला जाऊ नये . यासाठी कॅन्सर रोखण्यासाठी तिला हात कापावा लागेल अस डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर एमीने आपला जीव वाचवण्यासाठी हात कापला.
एमी सांगते की, “सुरुवातीचा काळ फार कठीण होता माझ्यासाठी की सकाळी उठल्या उठल्या माझ लक्ष हे कापलेल्या हाताकडे जात होते. आणि तो कापलेला हात बघून मला रडू यायचे . सुरुवातीला तिचा पती तिची मस्करी करायचा की मोबाईल वर चाट करून तिची ही अवस्था झाली पण आम्हाला दोघांना ही कल्पना नव्हती की हे एक कॅन्सर चे लक्षण आहे. पाहिले एक वर्ष मी या आजाराकडे दुर्लक्ष केले पण हातावरील सूज ही दुखत असल्याने ती डॉक्टरांकडे गेली होती. डॉक्टर ही सुरुवातीला कन्फर्म नव्हते की हा आजार कॅन्सर आहे. हातावर असलेले फोड जास्त दुखायला लागले त्यानंतर सर्जरीचा विचार केला . त्यानंतर हात गमवावा लागला मला यातून बाहेर येण्यासाठी खूप वेळ लागला .हेच आता माझे जीवन आहे. शरीरात जे काही वेगळे बदल होत आहेत त्याकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिला आहे.” आता एमी प्रत्येक गोष्टीसाठी तिच्या नवऱ्यावर अवलंबून आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.