कराड प्रतिनिधी । मोबाईलच्या दुकानातच ग्राहकाच्या हातात मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन आग लागल्याची धक्कादायक घटना कराड तालुक्यातील उंडाळे या गावात घडली आहे. दुकानातील CCTV मध्ये हि घटना कैद झाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु मोबाईल वापरताना काळजी घेणं आवश्यक आहे हे या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, उंडाळे येथील बाळसिद्ध मोबाईल शॉपीत मोबाईल दुरुस्त करण्यासाठी एक ग्राहक आला होता. सदर ग्राहकाने मोबाईल दुरुस्तीला दिल्यानंतर मोबाईल दुकानदाराने त्या मोबाईलची बॅटरी काढून ग्राहकाला परत दिली यावेळी ग्राहकाने ती बॅटरी तेथेच खोलण्याचा प्रयत्न केला असता जाग्यावरच अचानक बॅटरीचा स्फोट झाला. मोबाईलच्या दुकानातच ग्राहकाच्या हातात बॅटरीचा अचानक स्फोट झाल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी यावेळी झाली नाही.
ग्राहकाच्या हातातच मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट; घटना CCTV मध्ये कैद #Hellomaharashtra #mobile pic.twitter.com/3bjoQZhSCn
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) May 19, 2023
मोबाईल बॅटरीचा स्फोट होण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बॅटरीचा स्फोट होतानाच विडिओ कैद झाला आहे. सध्याच्या आधुनिक जगात मोबाईल हा जीवनावश्यक बनला आहे हे खरं असलं तरी त्याचा वापर हा योग्य पद्धतीने करायला हवा हाच संदेश आपण या बातमीतून घ्यायला हवा.