इस्लामाबाद । बुधवारी पाकिस्तानच्या अप्पर कोहिस्तान भागात कामगार छावणीजवळ झालेल्या बसच्या स्फोटात 13 जण ठार झाले. इतर अनेक जखमी असल्याचे सांगितले जात आहे. या बसमध्ये चिनी नागरिक होते. वृत्तसंस्था AFP च्या मते, मृतांमध्ये 9 चिनी इंजिनिअर आणि सुरक्षा दलाचे 2 जवानही आहेत.
पाकिस्तानी माध्यमांच्या म्हणण्यानुसार, ही बस दासू धरणावर काम करणाऱ्या चिनी इंजिनिअर्सना घेऊन जात होती. बसमध्ये 30 इंजिनिअर आणि कर्मचारी होते. बसचे पहारेकरी पाकिस्तानी सैनिक होते. अचानक बसचा स्फोट झाला. बॉम्ब कोठे ठेवला आणि त्याची घनता किती होती? सध्या यासंदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही. याबाबत चौकशी सुरू असल्याचे उपायुक्त मोहम्मद आरिफ यांनी सांगितले.
पोलिस आणि बचाव दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले जात आहे. यापूर्वी मंगळवारी खैबर पख्तूनख्वा येथे दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य केले. यामध्ये कॅप्टनसह 12 सैनिक ठार झाले तसेच 15 जवानही जखमी झाले. दहशतवाद्यांनी 6 टेलिकॉम ऑपरेटरना ओलिस ठेवले होते.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group