औरंगाबाद : सारथी संस्थेतर्फे एम.फील. आणि पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाहू महाराज संशोधन फेलोशिप देण्यात येते. सारथी फेलोशिपला अर्ज करण्यासाठी १५ जुलै पर्यंत नोंदणी असलेल्या विद्यार्थ्यांनाकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ द्या अशी मागणी केली आहे.
मराठा, कुणबी, कुणबी-मराठा प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मेहनती व गुणवत्ताधारक एम. फील आणि पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेकडुन छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन फेलोशिप सुरू करण्यात आली आहे, असे सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, संचालक मधुकर कोकाटे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले.
यासंबंधी सारथीकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीत १ जानेवारी २०२० तारखेनंतर १५ जुलै २०२१ पर्यंत नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.