बारावीचे मूल्यांकन पाठवण्यासाठी मुदतवाढ

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीनंतर आता बारावीच्या विद्यार्थ्यांचा अंतर्गत मूल्यमापणाद्वारे निकाल तयार केला जात आहे. शुक्रवारी मूल्यांकन अपलोड करण्यासाठी शेवटची मुदत होती. औरंगाबाद विभागाचे शुक्रवारपर्यंत ९९.७३ टक्के काम पूर्ण झाले असून, कनिष्ठ महाविद्यालयांच्या मागणी नुसार मूल्यांकन रविवार पर्यंत सादर करायची मुदतवाढ दिली आहे.

१६ जुलैपासून कनिष्ठ महाविद्यालयांनी निकालाचे काम शिक्षण मंडळाच्या सूचनेनुसार केले आहे. २३ जुलै पर्यंत अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी मंडळाने मुदतवाढ दिली होती. यावर्षी औरंगाबाद विभागातील जालना,परभणी,बीड,औरंगाबाद आणि हिंगोली या पाच जिल्यातुन एकूण १ लाख ४६ हजार ९२५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

शुक्रवारपर्यंत १लाख ४५ हजार ७६९ विद्यार्थ्यांचे निकाल भरण्यात आले होते. एकूण ९९.७३ टक्के काम पूर्ण झाले असून, १,३१३ कनिष्ठ महाविद्यालयांकडून बारावीचा निकाल भरण्यात आला. विद्यार्थ्यांचे मूल्यकंन पाठवण्यासाठी विद्यालयांना आज शेवटची मुदत असल्याचे मंडळातर्फे कळविण्यात आले होते.