हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| तुम्ही जर रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण की, मोदी सरकारने केंद्रात सत्ता स्थापित होतात शिधापत्रिकाधारकांना मोठा दिलासा दिलेला आहे. सरकारने नुकत्याच आधारकार्ड रेशन कार्डशी (Ration card) लिंक करण्याच्या तारखेमध्ये वाढ केली आहे. यामुळे रेशन कार्डधारकांना 30 जून ऐवजी 30 सप्टेंबरपर्यंत आधार आणि रेशन कार्ड लिंक करता येणार आहे. याबाबतची माहिती अधिसूचना अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने दिली आहे.
केंद्रामध्ये सत्ता स्थापित झाल्यानंतर मोदी सरकार जनतेसाठी विविध योजना आणताना दिसत आहे. आता मोदी सरकारने गोरगरिबांना दिलासा देत आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करण्याची मुदत तीन महिन्यांसाठी वाढवली आहे. यापूर्वी आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्याच्या अंतिम तारीख 30 जून होती. परंतु आता 30 सप्टेंबरपर्यंत या तारखे मध्ये वाढ करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महत्वाचे म्हणजे मोदी सरकारने ‘वन नेशन-वन रेशन कार्ड’ची घोषणा केल्यापासून रेशनकार्ड आधारकार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे. कारण की मधल्या काळामध्ये विविध भागातील लोक एकापेक्षा जास्त रेशन कार्ड घेऊन योजनेचा अधिक फायदा घेत असलेले निदर्शनात आले होते. यावर ठोस कारवाई व्हावी त्यामुळे सरकारने हा नियम लागू केला आहे. या नियमामुळे कोणत्याही व्यक्तीला एकापेक्षा अधिक रेशन कार्डवरून मोफत धान्य घेता येणार नाही.
रेशन कार्ड आधारशी लिंक कसे करावे??
सर्वात प्रथम सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) च्या वेबसाईटवर जावा.
समोर दिलेल्या विंडोवर आधार कार्ड क्रमांक, शिधापत्रिका क्रमांक आणि तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका.
यानंतर Continue या पर्यायावर क्लिक करा.
पुढे तुम्हाला मोबाईल नंबर वर वन टाइम पासवर्ड (OTP) येईल.
हा ओटीपी एंटर करून प्रकिया पुर्ण करा. या प्रोसेसने तुमचे आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक होईल.