हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सिडकोच्या (CIDCO) घरांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीची अंतिम मुदत शुक्रवारी १० जानेवारी रोजी संपणार आहे. सलग तीन वेळा मुदतवाढ देऊनही अनेक ग्राहकांनी अद्याप अर्ज केलेले नसल्यामुळे सिडकोने ऑनलाइन अर्ज नोंदणीचा पर्याय सुरू ठेवला आहे. हा पर्याय फक्त घर निवडीच्या प्रक्रियेच्या कालावधीतच उपलब्ध असेल. त्यानंतर कोणत्याही व्यक्तीला ऑनलाईन अर्ज करता येणार नाही.
“माझे पसंतीचे सिडको घर” या योजनेतील घरांच्या किमती सिडकोने ९ जानेवारीच्या मध्यरात्री जाहीर केल्या आहेत. ज्यामुळे अर्जदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या १ लाख ३४ हजारांहून अधिक अर्ज सिडकोकडे आले आहेत. त्यातील ५४ हजार ७६८ अर्जदारांनी शुल्क भरून पुढच्या टप्प्यासाठी पात्रता मिळवली आहे. आता ११ जानेवारीपासून हे अर्जदार घर निवडीच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील.
दरम्यान, सिडकोच्या या निर्णयामुळे अर्ज नोंदणी न केलेल्या इच्छुक ग्राहकांना पसंतीचे घर मिळवण्यासाठी आणखी एक संधी मिळाली आहे. तसेच आता अर्जदारांच्या संख्येत देखील वाढ होण्याची शक्यता वाढली आहे.