श्रमिकांसाठी खुश खबर! आता 10 मिनिटे जास्त काम पण मानलं जाणार ओव्हरटाइम; कंपनीला करावे लागेल या गोष्टींचे सक्त पालन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कामगारांसाठी लवकरच वेतन संहिता लागू करण्याची तयारी सरकार करीत आहे. याअंतर्गत कामगारांना अनेक प्रकारच्या सुविधादेखील पुरविल्या जातील. त्यानुसार जास्तीत जास्त कामकाजाचे तास 12 तास करण्याचे प्रस्तावित केले आहे. नियमांनुसार, जर एखादा कर्मचारी ठरवलेल्या कामापेक्षा 15 ते 30 मिनिट अधिक काम करत असेल तर ते ओव्हरटाईमच्या 30 मिनिटांप्रमाणे मोजले जाईल, ज्यासाठी कर्मचार्‍यांना जास्तीचे पैसे दिले जातील.

तसेच मसुद्याच्या नियमांनुसार सलग 5 तास काम केलेल्या कोणत्याही कर्मचार्‍यास अर्धा तास विश्रांती देण्यात यावी. कोणत्याही कामगारांना 5 तासापेक्षा जास्त काळ काम करणे प्रतिबंधित आहे. नवीन कामगार कायद्यांमध्ये कंपन्यांना पीएफ आणि ईएसआयसारख्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. ह्या नव्या नियमांमुळे कामगारांचे जीवन थोडे सुकर होणार आहे. त्यांना त्यांच्या कामात थोडा विसावा देखील मिळणार आहे.

कोणत्याही कंपनीने असे न केल्यास त्यावर कारवाई केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत सर्व कंपन्यांना नवीन वेज कोड पाळला पाहिजे. मंत्रालय नवीन कामगार कायद्यांवर सर्व भागधारकांची मते, सूचना आणि टिप्पण्या मागवन्याचा देखील विचार करीत आहे. सरकारने 29 केंद्रीय कामगार कायद्यांना जोडून 4 नवीन संहिता तयार केल्या आहेत. त्यांची नावे औद्योगिक संबंध कोड, व्यावसायिक सुरक्षा कोड, आरोग्य आणि कार्यरत परिस्थिती कोड (ओएसएच), सामाजिक सुरक्षा कोड आणि मजुरीवरील कोड अशी आहेत.

You might also like