धक्कादायक! अनैतिक संबंधातून प्रेमी युगालाची धिंड

0
35
Extra Marrital Affair
Extra Marrital Affair
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भंडारा | स्वप्नील हिंगे

प्रेम हे पवित्र असते असे म्हटले जाते. परंतु तेच प्रेम लग्नानंतर होत असेल तर त्याला अनैतिक संबंधाची जोड दिली जाते. अशीच एक घटना भंडारातील पवनी तालुक्यातील कोंढा गावात घडली आहे. गावकर्यांणी सदर प्रेमीयुगुलाची धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे भंडारा आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हाती आलेल्या माहीतीनुसार, रामकृष्ण कोलांजीकर या पुरुषाचे त्याच्याच गावातील एका विवाहीत महिलेशी प्रेमसंबंध होते. या प्रेमीयुगलाच्या संबंधाची  गावभर चर्चा होती. विवाहीत महीला दोन मुलांची आई असल्याने आणि रामकृष्ण याच्या घरासमोरच संबधीत महिला राहत असल्याने गावभर उलट सुलट चर्चांना पेव सुटला होता. यामुळे दोघांच्याही घरात तणावाचे वातावरण होते. तसेच अनैतिक संबंधावरून त्यांच्या नातेवाइकांनीही त्यांना समाजावून सांगितले होते. परंतू तरीही दोघे आपापल्या निर्णयांवर ठाम होते अाणि त्यांचे प्रेम प्रकरण सुरूच होते. दरम्यान विवाहीत महिला रविवारी २ डिसेंबर रोजी रामकृष्ण याच्या घरी आली आणि आम्हाला पती-पत्नी प्रमाणे राहायचे असे सांगू लागली. परिणामी पुरुषाच्या नातेवाईकांचा राग अनावर झाला. रामकृष्ण याचा मोठा भाऊ, धाकटा भाऊ, त्यांची पत्नी, वडिलांनी त्या दोघांना हातगाडीच्या रिक्षात बसवून गावात धिंड काढली.

गावकर्यांनी धिंड काढल्याबाबत संबंधित पुरुषाने पोलीसात तक्रार केली असून धिंड काढल्याप्रकरनी १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

इतर महत्वाचे –

या पाच कारणांमूळे हनीमूनला जाणे महत्वाचे

बाॅयफ्रेंड सोबत पळून जाण्यासाठी तिने रचला स्वत:च्याच हत्येचा कट

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here