Eye Care Tips | पावसाळा ऋतू अनेकांना आवडतो. परंतु पावसाळा आला की, त्याच्यासोबत अनेक आजार देखील येत असतात. पावसाळ्यात डोळ्याच्या संसर्गाचा धोका देखील सगळ्यात जास्त असतो. आपल्या शरीरातील डोळे हा अवयव अत्यंत संवेदनशील असतो. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. पावसाळ्यात संसर्गाचा जास्त धोका असतो. अशावेळी तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधने खूप गरजेचे असते. परंतु त्यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात देखील काही गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. आज आम्ही तुम्हाला डोळ्यांचे (Eye Care Tips) संबंधित अशा काही टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला डोळ्यांच्या संसर्गापासून आराम मिळेल.
वारंवार हात धुवा | Eye Care Tips
पावसाळ्यात हातांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. तुमच्या जवळ सॅनिटायझर असल्यास ते चांगले आहे, अन्यथा तुम्ही ते साबण आणि पाण्याने देखील स्वच्छ ठेवू शकता. हे महत्त्वाचे आहे कारण हवेतील आर्द्रतेमुळे जंतू वेगाने पसरतात आणि जर तुम्ही कोणत्याही पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतर डोळे चोळले किंवा स्पर्श केला तर संसर्गाचा धोका वाढतो.
मेकअप प्रोडक्टस स्वच्छ ठेवा
मेकअप प्रोडक्टस किंवा विशेषत: डोळ्यांचा मेकअप वापरताना ब्रश, आयलाइनर आणि मस्करा निर्जंतुक करण्यास विसरू नका, कारण ते एकापेक्षा जास्त वेळा किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला वापरल्यास डोळ्यांच्या संसर्गाचा धोका वाढतो.
पावसात काळजी घ्या
पावसाळ्यात डोळ्यांना बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका खूप वाढतो, अशा परिस्थितीत त्यांना चिखल किंवा घाण पाण्यापासून संरक्षित ठेवा आणि पावसात भिजल्यानंतर किंवा आंघोळीनंतर डोळे साध्या पाण्याने धुवा.
स्वच्छतेची काळजी घ्या | Eye Care Tips
या ऋतूमध्ये चुकूनही तुमचा रुमाल किंवा टॉवेल कोणाशीही शेअर करू नका. आम्ही तुम्हाला सांगतो की, वैयक्तिक काळजीशी संबंधित सर्व गोष्टींमध्ये बॅक्टेरियाचा धोका असतो, अशा परिस्थितीत डोळ्यांचा संसर्ग टाळण्यासाठी या गोष्टी इतर लोकांच्या आवाक्याबाहेर ठेवणं आणि त्यांची स्वच्छता करत राहणं गरजेचं आहे.
पोहणे टाळा
या ऋतूत बॅक्टेरिया आणि विषाणूंचा प्रसार झपाट्याने होतो. अशा परिस्थितीत स्विमिंग पूलवर जाणेही टाळावे. हे पाणी तुमच्या डोळ्यांसाठीच नाही तर नाक, कान आणि त्वचेसाठीही खूप हानिकारक ठरू शकते.