फेसबुकच्या मार्केटिंग संचालकपदी अविनाश पंत; भारतीय बाजारपेठेत स्थिरावण्यासाठी फेसबुकची नवी रणनीती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । भारताच्या अविनाश पंत यांची फेसबुकच्या विपणन (मार्केटिंग) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतात मार्केटिंगवर अधिक भर देण्याचा फेसबुकचा विचार असल्याचं या निर्णयातून स्पष्ट होत आहे. विपणन संचालक हे नवं पद असेल आणि फेसबुक, इंस्टाग्राम व व्हॉट्सअपसह फेसबुकच्या मालकिच्या सर्व एप्सवरील मार्केटिंगच्या प्रयत्नांवर देखरेख ठेवण्याची मुख्य जबाबदारी त्यांच्यावर असेल. पंत यांच्याकडे २२ वर्षांचा अनुभव असल्याची माहिती फेसबुकने दिली. पंत यांच्याकडे यापूर्वी नाइकी, कोकाकोला, दी वॉल्ट डिज्नी कंपनी आणि रेडबुल यांसारख्या कंपन्यांसोबत काम करण्याचा मोठा अनुभव आहे.

शारीरिक स्वास्थ्य महत्त्वाचं मानणाऱ्या अविनाश पंत यांनी आपल्या कामांतून अनेक कंपन्यांना यशाच्या शिखरापर्यंत पोहचवलं आहे. रेडबुलचे भारतातील मार्केटिंग प्रमुख म्हणून त्यांनी अखेरची जबाबदारी सांभाळली होती. ब्रँड म्हणून रेडबुलची ओळख निर्माण करण्याची त्यांच्यावर मुख्य जबाबदारी होती. आयआयएम अहमदाबाद येथून उत्तीर्ण झालेले पंत हे फेसबुकचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष अजित मोहन यांना कामासंबंधीचा अहवाल सादर करतील.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास NIAकडे देण्याचा केंद्राचा निर्णय असंवैधानिक – बाळासाहेब थोरात

असे बनले भारताचे संविधान…

आयकर नियमात नवीन बदल; ‘या’ २ गोष्टींची माहिती न दिल्यास कंपनी तुमचा पगार कापणार