हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेलं फेसबुक आणि व्हाट्सअप्पची सेवा रात्री 10 च्या सुमारास अचानकपणे खंडित झाल्याने युजर्सची चिंता वाढवली होती. तब्बल 6 तासांनंतर दोन्ही सेवा पूर्वपदावर आल्या. मात्र 6 तास सेवा ठप्प झाल्याने फेसबुकचं मोठं नुकसान झाले आहे. कंपनीचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. तसेच लोकांची माफी देखील मागितली आहे.
फेसबुकला आलेल्या 6 तांसाच्या व्यत्ययामुळे कंपनीच्या रेव्यन्यूमध्ये 80 मिलियन्स डॉलर म्हणजेच जवळपास 596 कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. तर कंपनीचे संस्थापक मार्क झुकरबर्गची संपत्ती एका दिवसात 7 बिलियन्स डॉलर म्हणजेच 52,190 कोटी रुपयांनी घटली आहे.
फेसबुक, इन्स्ट्राग्राम आणि व्हॉट्सअप बंद पडल्याने इंटरनेट ग्लोबल ऑब्जर्वेटरीच्या अंदाजानुसार जगभरातील अर्थव्यवस्थेला प्रति तासाला 160 मिलियन्स डॉलर म्हणजेच 1192.9 कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. दरम्यान, या व्यत्ययामुळे आपण सर्वांची माफी मागतो असे मार्क झुकेरबर्ग यांनी म्हंटल.