फेसबुकवरील मैत्री पडली महागात, मित्राने बलात्कार करून पीडितेच्या वडिलांकडे केली 10 लाखांची मागणी

0
61
rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ : वृत्तसंस्था – सोशल मीडियावरील मैत्री एका तरुणीला चांगलीच महागात पडली आहे. यामध्ये आरोपीने पीडित तरुणीला जेवणातून गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार केले आहेत. हा आरोपी तरुण एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने तर त्याने पीडित मुलीवर बलात्कार करतानाचा व्हिडीओ शूट केला आहे. यानंतर आरोपी तरुणाने हा व्हिडिओ पीडित तरुणीच्या वडिलांना पाठवून दहा लाखांची खंडणी मागितली आहे. यानंतर पीडितेने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आरोपीविरुद्ध पोलिसांनी बलात्कारासह ब्लॅकमेल आणि खंडणीच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.

आरोपी तरुणाचे नाव सनी गुप्ता असं आहे. आरोपी हा आग्रा येथील रहिवासी आहे. पीडित तरुणी ही उत्तर प्रदेशातील तालकटोरात येथील रहिवासी असून 2019 साली फेसबुकवरून तिची ओळख सनी गुप्ता नावाच्या तरुणाशी झाली होती. यांची मैत्री झाल्यानंतर आरोपी सनी तिच्याशी सतत बोलायचा. तसेच काही वेळा तो लखनऊ येथे पीडित तरुणीला भेटायला देखील आला होता.त्यावेळी त्याने पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून पीडितेला एका हॉटेलात बोलावलं. याठिकाणी आरोपीनं पीडितेला गुंगीचं औषध देत तिच्यावर बलात्कार केला.

नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने बलात्कार करतानाचा व्हिडीओ देखील आपल्या मोबाइलमध्ये शूट केला. यानंतर त्याने बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने अनेकवेळा पीडितेवर अत्याचार केला आहे. यानंतर आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं त्याला भेटण्यास नकार दिला. यामुळे आरोपीने संबंधित अश्लील व्हिडीओ पीडित तरुणीच्या वडिलांना पाठवून त्यांच्याकडून दहा लाख रुपयांची मागणी केली. यानंतर पीडितेने तक्रार दाखल करताच पोलिसांनी आरोपी सनी गुप्ता याला आलमबाग येथून अटक केली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here