नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकन कंपनी फेसबुक एक नवीन फिचर लॉन्च करणार आहे. हे नवीन फिचर फेक न्यूज आणि अफवांना नियंत्रणात आणण्याच्या हेतूने आणण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत जर तुम्ही कोणते आर्टिकल शेअर केले तर तुम्हाला एक पॉपअप मिळणार आहे. सध्या फेसबुकमध्ये असलेले बहुतांश फिचर्स हे बाकी सोशल मीडियावर यापूर्वीच होते.
यानंतर फेसबुकने स्वतःकडे घेतले. त्यानंतर आता जेव्हा तुम्ही कोणतेही आर्टिकल शेअर करत असाल तेव्हा तुम्हाला पॉप अपमध्ये विचारण्यात येईल कि तुम्ही ते आर्टिकल वाचले की नाही. याअगोदर हे फीचर्स ट्विटर आले होते. सध्या तुम्ही ट्विटरवर कोणतेही आर्टिकल रिट्विट करता तेव्हा तुम्हाला सर्वात पहिले विचारले जाते की तुम्ही हे पहिले वाचावे मग रिट्विट करावे.
फेसबुक सध्या अशा प्रकारच्या फिचरवर टेस्टिंग करत आहेत. हे फीचर्स जगभरात 6 टक्के अँड्राईड फेसबुक युजर्ससाठी जारी करण्यात आले आहे. सध्या या फिचरचे टेस्टिंग चालू आहे. या नव्या पॉप अप फिचरच्या माध्यमातून युजर्सला शेअर करण्यापूर्वी चांगली आयडिया मिळणार आहे असे फेसबुकने सांगितले आहे. या नव्या फीचर्समुळे सोशल मीडियावर पसरणाऱ्या फेक न्यूज आणि अफवांपासून तुम्ही वाचू शकता.