कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यातील लाेणंद या गावात एका रुग्णास रेमडेसिव्हीर इंजेक्शनची आवश्यकता हाेती. खंडाळा तालुक्यातील काॅंग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांना अडचण सांगितली. अन् केवळ काही काळातच कार्यकर्त्यांच्या हाकेला मनोहर भाऊंनी धाव घेत अडचण सोडवली. त्यामुळे सातारा जिल्हा काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यात सध्या मनोहर भाऊंच्या कामाच्या बोलबाला सुरू आहे.
खंडाळा तालुक्यातील रुग्णासाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शन पाहिजे असताना. स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तातडीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय आणि कराड येथील मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनाेहर शिंदे यांना संपर्क साधून रुग्णाची परिस्थिती सांगितली. त्यानंतर मनोहर शिंदे यांनी स्वतः खंडाळा येथे जाऊन संबंधितास रेमडेसिव्हीर दिले. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांसह कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला. मनोहर शिंदे यांनी कार्यत्तपरतेची सर्वच जण काैतुक करीत आहेत.
https://www.facebook.com/103379351659363/posts/173518727978758/
मनोहर शिंदे यांच्या या कामांची दखल भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस पार्टी खंडाळा तालुका या फेसबुक पेजवर घेतली आहे. कोरोना महामारीच्या काळात प्रत्येक कार्यकर्ता काम करत आहे. मनोहर शिंदे यांचे कार्य हे नेहमीच समाजिक सेवेचे राहिलेले आहे, आता त्याच्या कार्यतत्परेतेने पुन्हा एकदा दिसून आले.
अनेक नागरिक आपल्या नेत्यांकडे देखील रेमडेसिव्हीर इंजेक्शनबाबत चाैकशी करीत असतात. अशावेळी कोणाच्यातरी माध्यमातून इंजेक्शन मिळेल अशी मित्रांकडून, नातेवाईक, कार्यकर्त्यांची भावना असते. या परिस्थितीत देखील लाेक एकमेकांच्या मदतीला धावून येत आहेत. अशा परिस्थितीत मनोहर शिंदे यांनी तत्परता दाखवून कार्यकर्त्यांला मदत केली आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group