Facial At Home | आपण सुंदर दिसावे, आपली त्वचा एकदम नितळ आणि निर्मळ असावी. असे प्रत्येकालाच वाटते. आणि यासाठी बऱ्याच स्त्रिया पार्लरमध्ये जाऊन अनेक ट्रीटमेंट करत असतात. परंतु पार्लरमधील या उत्पादनांमध्ये केमिकल असते. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्याला देखील हानी पोहोचण्याची शक्यता असते. म्हणूनच अनेक महिला या आता नैसर्गिक उपचाराकडे वळल्या आहेत. त्या घरगुती पद्धतीने स्वतःला सुंदर करण्याचा प्रयत्न करत असतातम इतकच नाही तर आजकाल अनेक सिनेअभिनेत्री देखील नैसर्गिक उपचारांवर जास्त विश्वास ठेवतात. तुम्ही आता या दिवाळीत अत्यंत सुंदर आणि ग्लोइंग दिसण्यासाठी काही घरगुती उपायांचा उपयोग करून एकदम सुंदर दिसू शकता.
दिवाळी जवळ आलेली आहे. आणि या दिवाळीमध्ये प्रत्येक महिलेला आपण सुंदर दिसावे असे वाटते अशावेळी तुम्ही दहा मिनिटात फेशियल (Facial At Home) करू शकता. ज्यामुळे तुमची त्वचा एकदम गोइंग होईल. आता तुम्ही तीन पद्धतीने घरच्या घरी घरातील पदार्थांचा वापर करून फेशियल करू शकता.
एक्सफोलिएट | Facial At Home
फेशियल करण्यासाठी तुमची त्वचा एक्सफोलिएट करणे गरजेचे असते. यासाठी तुम्ही तांदळाचे पीठ आणि दुधाची साय याची गरज आहे. तुम्ही स्वच्छ पाण्याने चेहरा धुऊन घ्या. त्यानंतर चेहरा स्क्रब करण्यासाठी एक चमचा तांदळाचे पीठ घ्या आणि त्यात दुधाची साय मिसळा. आणि तुमच्या मानेवर तसेच चेहऱ्यावर स्क्रब करा आणि स्क्रब झाल्यावर धुवून टाका.
मसाज करणे
एक्सफोलेशन झाल्यावर मसाज करणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही दुधाची साय एक चिमूटभर हळद आणि एक चमचा बेसन पीठ मिसळा आणि त्याची एक पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर व्यवस्थित तुमच्या चेहऱ्यावर मेसेज करा. काही मिनिटे तुमचा चेहरा आणि मानेला हा मसाज करत राहा. त्यामुळे त्वचा बाहेरून सुंदर होते आणि चेहऱ्यावर असलेले तेल देखील निघून जाते. आणि तुमचा चेहरा एकदम क्लीन होतो त्यानंतर तुम्ही वाफ घ्या.
फेस पॅक लावणे | Facial At Home
फेस पॅक लावण्यासाठी सायीमध्ये थोडीशी मध आणि चिमूटभर हळद मिसळून पेस्ट करा. त्यानंतर ही पेस्ट तुमच्या चेहऱ्याला लावा. काही वेळ ती तसेच सुकून द्या. चेहऱ्यावरील पॅक थोडासा सुकल्यानंतर साध्या पाण्याने धुऊन टाका. या सगळ्या स्टेप्स पूर्ण केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर अगदी पार्लर सारखा ग्लो येऊन जाईल. तुम्ही अगदी दहा मिनिटात घरच्या घरी हा इन्स्टंट ग्लो येणारा फेस पॅक करू शकता. यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही. त्याचप्रमाणे पिंपल्स किंवा डाग असतील तर ते देखील निघून जाईल.