कायरन पोलार्डच्या गाडीला खरंच भीषण अपघात झाला? जाणून घ्या या बातमीमागील सत्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजकाल इंटनेटच्या युगात अनेक गोष्टी झटकन व्हायरल होतात. आधुनिक जगात माहिती देणारी माध्यमं वाढली आहेत. याचा जसा फायदा आहे, तसंच याचा गैरफायदा घेणारी देखील काही मंडळी आहेत आणि याच बातम्या इंटरनेटवर अगदी वेगानं पसरतात. असाच एक प्रकार एका आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सोबत घडला आहे.

वेस्ट इंडिजचा कर्णधार आणि आक्रमक खेळाडू तसेच आयपीएल मधील मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians ) प्रमुख सदस्य आणि वेस्ट इंडिजचा (West Indies) वन-डे आणि टी 20 टीमचा कॅप्टन कायरन पोलार्ड ( Kieron Pollard) बद्दलही एक बातमी सर्वत्र व्हायरल झाली होती. त्या बातमीनं अनेकांना धक्का बसला होता.

कायरन पोलार्डच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची चर्चा शुक्रवारी दिवसभर सोशल मीडियावर रंगली होती. या अपघाताचे काही व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. या अपघातामध्ये पोलार्डचा मृत्यू झाल्याचा दावाही करण्यात येत होता त्यामुळे काही फॅन्सनी या बातमीची पडताळणी न करता पोलार्डला चक्क श्रद्धांजली देखील वाहिली.

नक्की काय आहे सत्य?

या सर्व अफवा ज्याच्याबद्दल पसरवल्या जात आहेत, तो पोलार्ड सध्या आबुधाबीमधील T10 लीगमध्ये (T10 League 2021) खेळत आहे. तो या स्पर्धेतील डेक्कन ग्लॅडिएटर्स या टीमचा कॅप्टन आहे. पुणे डेव्हिल्स विरुद्ध झालेल्या पहिल्या मॅचमध्ये पोलार्ड अपयशी ठरला. तो फक्त 2 रन काढून आऊट झाला. पुणे डेव्हिल्सनं ही मॅच सात विकेट्सनं जिंकली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment