हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकार 18 ते 50 वयोगटातील बेरोजगारांना प्रतिमहिना 3800 रुपये बेरोजगारी भत्ता देणार आहे. आपण बेरोजगार असाल तर, खाली दिलेल्या लिंकमध्ये माहिती भरा. अशा प्रकारचा एक मेसेज सध्या व्हाट्सअप आणि सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये सत्य काय आहे हे जाणून घेण्याचा ‘हॅलो महाराष्ट्रने’ प्रयत्न केला. सत्य शोधून काढले आम्ही ते सत्य तुमच्यापुढे मांडत आहोत.
सध्या व्हाट्सअपवरती अनेक प्रकारचे मेसेजेस फिरत असतात. काही वेळा ही माहिती खरी, तर खूपदा ही माहिती खोटी सुद्धा असते. यामध्ये नोकरी, कर्ज आणि त्या प्रकारचे वेगवेगळे आमिष दाखवून तरुणांना जाळ्यात ओढले जाते. अशाच प्रकारची खोटी माहिती या मेसेज द्वारे दिली गेल्याचे ‘प्रेस इन्फर्मेशन ब्यूरो’ म्हणजेच PIB ने स्पष्ट केले आहे. PIB म्हणते की, ‘अशा प्रकारचे कोणतेही बेरोजगार भत्ता केंद्र शासनाने जाहीर केलेला नाही. ही बातमी खोटी आहे ‘.
जर आपल्याला अशा प्रकारचे मेसेजेस मिळाले असतील आणि त्यामागचे सत्य तुम्हाला जाणून घ्यायचे असेल. मिळालेली न्यूज खरी आहे की खोटी. हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही तो मेसेज https://factcheck.pib.gov.in या लिंक वरती पाठवा. त्याला पर्याय म्हणजे तुम्ही आपल्या व्हाट्सअप वरून +918799711259 या नंबर वरती मेसेज पाठवू शकता. तसेच [email protected] या ईमेल आयडीवरतीही तो मेसेज पाठवता येईल. फॅक्ट चेक करण्यासाठी खालील लिंक सुद्धा वापरता येऊ शकते https://pib.gov.in
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’