हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे चांगले संबंध आहेत. फडणवीसांनी आम्हाला स्वत:हून संरक्षण दिलं असून भाजप शासित राज्यात आम्हाला संरक्षण मिळतंय, अशी माहिती बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
जेव्हा आम्ही एकटे पडलो तेव्हा देवेंद्र फडणवीसांनीच आपल्याला संरक्षण दिलं आहे. महाराष्ट्रात लवकरात लवकर येण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. फ्लोअर टेस्ट घ्या, त्यावेळी आम्ही आमची भूमिका मांडू, असं दीपक केसरकर म्हणाले. संजय राऊत यांच्यासारखे प्रवक्ते कोणत्याही पक्षाला मिळू नये अशा शब्दांत त्यांनी राऊतांवर निशाणा साधला.
शरद पवारांनी तीन वेळा शिवसेना फोडली. शिवसेनेचा आमदार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणच्या राष्ट्रवादीच्या पडलेल्या उमेदवाराला ताकत दिली जातेय. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना त्यांच्यावर विश्वास होता, पण राष्ट्रवादी आता शिवसेना संपवत आहे अस म्हणत केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर टीका केली.