हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Fairness Creams Side Effects) सुंदर दिसण्यासाठी मेकअप, सर्जरी, महागडे प्रोडक्ट्स वापरायला हवेत हा निव्वळ एक गैरसमज आहे. मात्र आजच्या घडीला १०० पैकी ९९ लोक याच गोष्टींच्या माध्यामातून सुंदर दिसण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे बाजारात विकली जाणारी वेगवेगळी ब्युटी प्रोडक्ट्स, थेरेपी मशिन्स दिवसेंदिवस महाग होत चालले आहेत. अनेक लोक आपल्या रंगाबाबत न्यूनगंड बाळगतात. असे लोक सतत गोरे होण्याच्या प्रयत्नात असतात. तर गोरे लोक रंग टिकवण्याच्या नादात महागडे फेअरनेस क्रीम्स वापरतात. पण या क्रीम्सचा अगदी उलट परिणाम होतो आणि यातील केमिकल्स स्किन डॅमेज करतात.
आजकाल बाजारात रंग उजळ करून देणारी क्रीम्सची सर्रास विक्री होताना दिसते. (Fairness Creams Side Effects) अनेक प्रोडक्ट्सच्या जाहिराती मोठ मोठे दावे करतात. अशा फसव्या जाहिरातींना भुलून लोक या क्रिम्सचा त्वचेवर वापर करतात आणि त्वचेचे नुकसान करतात. तुम्हीही असे फेअरनेस क्रीम वापरत असाल तर आताच सावध व्हा!! अन्यथा मोठ्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. याबाबत तज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊया.
फेअरनेस क्रीममूळे होणारे दुष्परिणाम (Fairness Creams Side Effects)
काही तज्ञांनी केलेल्या अभ्यासानंतर समोर आलेल्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, देशभरात फेअरनेस क्रीमची विक्री जोरात सुरु आहे. ज्यामध्ये पारा मोठ्या प्रमाणात वापरला जातोय. यामुळे तुमच्या त्वचेचे नुकसान होतेच शिवाय पारा तुमच्या किडनीलादेखील हानी पोहचते, असा निष्कर्ष या संशोधनात काढण्यात आला. हे संशोधन किडनी इंटरनॅशनल या मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. या अभ्यासात तज्ज्ञांनी सांगितले आहे की, ‘उच्च पारा सामग्री असलेल्या फेअरनेस क्रीमच्या वापराने मेम्ब्रेनस नेफ्रोथेलाला होऊ शकतो’.
‘त्यामुळे किडनीचा फिल्टर खराब होऊन किडनीचे मोठे नुकसान होते. तसेच प्रथिनांमुळे गळती होते. यामुळे मूत्रपिंडाचा विकारदेखील होऊ शकतो’. (Fairness Creams Side Effects) याशिवाय तज्ञांनी सादर केलेल्या रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, ‘फेअरनेस क्रीममध्ये असणारा पारा किडनीचा फिल्टर खराब करतो. हळूहळू किडनी निकामी होते आणि मोठ्या समस्या निर्माण होतात. यामुळे नेफ्रोटिक सिंड्रोमच्या प्रकरणांमध्येदेखील वाढ झाल्याचे’, डॉक्टरांनी म्हटले आहे.
मेम्ब्रेनस नेफ्रोथेलालाच्या रुग्णांमध्ये दिसून आलेली लक्षणे
अधिक पारा वापरून बनवण्यात आलेल्या फेअरनेस क्रीमच्या वापरामुळे मेम्ब्रेनस नेफ्रोथेलालाची काही प्रकरणे समोर आली आहेत. जुलै २०२१ ते सप्टेंबर २०२१ दरम्यान या आजराची २२ प्रकरणे समोर आली. त्यांची तपासणी केल्यास खालील लक्षणे दिसून आली.
शारीरिक थकवा,
सौम्य सूज,
लघवीमध्ये फेस वाढणे,
तीव्र दाह किंवा जळजळ,
रक्तात गुठळ्या होणे.